कोळशाने भरलेला ट्रक व मोटारसायकलची टक्कर, दोन्ही वाहने कोसळली दरीत

By राजेश भोस्तेकर | Published: September 11, 2022 06:57 PM2022-09-11T18:57:11+5:302022-09-11T18:59:05+5:30

मोटारसायकल स्वार कोळशाच्या ढिगाऱ्याखाली अडकला, मदतकार्य सुरू.

A truck full of coal and a motorcycle collided, both vehicles fell into the valley | कोळशाने भरलेला ट्रक व मोटारसायकलची टक्कर, दोन्ही वाहने कोसळली दरीत

कोळशाने भरलेला ट्रक व मोटारसायकलची टक्कर, दोन्ही वाहने कोसळली दरीत

Next

अलिबाग: रोहा भिसे खिंड, वाहतूक व प्रवासाच्या दृष्टीने धोकादायक बनली आहे. रोह्यातून कोळशाने भरलेला ट्रक भिसे खिंडी मार्गे नागोठणे कडे येत होता. यावेळी भिसे खिंडीत मधोमध अपघाती वळणावर ट्रकची मोटार सायकलला धडक बसून ट्रक व मोटारसायकल खोल दरीत कोसळली. मोटारसायकल स्वार कोळशाच्या ढिगाऱ्याखाली अडकला आहे. अशातच मुसळधार पाऊस व खोल दरी यामुळे मदतकार्यात अडथळे निर्माण झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच डीवायसपी किरण सूर्यवंशी, पोलीस निरीक्षक राजन जगताप व स्थानिक ग्रामस्थ मदतीसाठी पोहचले आहेत.

Web Title: A truck full of coal and a motorcycle collided, both vehicles fell into the valley

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.