Join us  

कोळशाने भरलेला ट्रक व मोटारसायकलची टक्कर, दोन्ही वाहने कोसळली दरीत

By राजेश भोस्तेकर | Published: September 11, 2022 6:57 PM

मोटारसायकल स्वार कोळशाच्या ढिगाऱ्याखाली अडकला, मदतकार्य सुरू.

अलिबाग: रोहा भिसे खिंड, वाहतूक व प्रवासाच्या दृष्टीने धोकादायक बनली आहे. रोह्यातून कोळशाने भरलेला ट्रक भिसे खिंडी मार्गे नागोठणे कडे येत होता. यावेळी भिसे खिंडीत मधोमध अपघाती वळणावर ट्रकची मोटार सायकलला धडक बसून ट्रक व मोटारसायकल खोल दरीत कोसळली. मोटारसायकल स्वार कोळशाच्या ढिगाऱ्याखाली अडकला आहे. अशातच मुसळधार पाऊस व खोल दरी यामुळे मदतकार्यात अडथळे निर्माण झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच डीवायसपी किरण सूर्यवंशी, पोलीस निरीक्षक राजन जगताप व स्थानिक ग्रामस्थ मदतीसाठी पोहचले आहेत.

टॅग्स :अलिबागअपघात