अडीच वर्षाच्या चिमुकल्याचा शॉक लागून मृत्यू; नालासोपाऱ्याच्या आचोळा डोंगरी येथील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2022 19:42 IST2022-09-26T19:40:18+5:302022-09-26T19:42:26+5:30
नालासोपारा येथे अडीच वर्षीय मुलाचा शॉक लागून मृत्यू झाला.

अडीच वर्षाच्या चिमुकल्याचा शॉक लागून मृत्यू; नालासोपाऱ्याच्या आचोळा डोंगरी येथील घटना
मंगेश कराळे
नालासोपारा: शहरातील पूर्वेकडील आचोळे डोंगरी येथील एकता वाल्मिकी वेल्फेअर सोसायटी चाळीत राहणाऱ्या अंश कागडा या अडीच वर्षाच्या चिमुकल्याचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेनंतर सदर परिवारावर शोककळा पसरली आहे. घटनेच्या दुपारी अंशचे वडील देव कागडा हे घरात आंघोळीसाठी गरम पाणी करण्यासाठी बादलीमध्ये हिटर लावून बाथरूमला गेले.
त्यावेळेस त्यांचा लहान मुलगा अंश हा खेळता खेळता हिटर लावलेल्या बादलीजवळ गेल्यावर त्याला शॉक लागून मृत्यू झाला आहे. घरच्यांनी त्याला जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी नेले पण तेथील डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. आचोळे पोलिसांनी सदर घटनेप्रकरणी चौकशी व तपास करून अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.