मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर आज दोन तासांचा ब्लॉक
By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2023 06:17 AM2023-09-01T06:17:32+5:302023-09-01T06:17:49+5:30
यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर पुण्याकडे जाणाऱ्या मार्गिकेत लोणावळा एक्झिट येथे गँट्री बसविण्याचे काम एमएसआरडीसीकडून केले जाणार आहे.
मुंबई : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर शुक्रवारी, १ सप्टेंबरला गँट्री बसविली जाणार असल्याने पुण्याकडे जाणारी वाहतूक दुपारी १२ ते २ या वेळेत दोन तास बंद ठेवण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळातर्फे (एमएसआरडीसी) कळविण्यात आले आहे.
यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर पुण्याकडे जाणाऱ्या मार्गिकेत लोणावळा एक्झिट येथे गँट्री बसविण्याचे काम एमएसआरडीसीकडून केले जाणार आहे. या कामासाठी दुपारी दोन तास पुण्याकडे जाणारी वाहतूक पूर्णत: बंद ठेवण्यात येणार आहे. दुपारी १२ ते २ या ब्लॉकच्या कालावधीत वाहनचालकांना खंडाळा एक्झिटमार्गे जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरून वळवण येथील पथकर नाक्यावरून पुन्हा पुण्याच्या दिशेने द्रुतगती मार्गावरून जाता येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने दिली आहे.