Join us

मागाठाणेत राबवला अनोखा कार्यक्रम; 1500 गंगा भागीरथ महिलांचा साडी चोळीने सन्मान

By मनोहर कुंभेजकर | Published: February 20, 2024 12:31 PM

सुर्वे यांच्या नवीन कार्यालयात हा सत्कार सोहळा आयोजित केला होते.

मुंबई - लग्न झालेल्या महिलांसाठी संक्रांतीपासून ते रथसप्तमी पर्यंत हळदीकुंकू समारंभ विविध राजकीय पक्षांचे आमदार,लोकप्रितिनिधी,महिला मंडळ हे त्यांच्या त्यांच्या भागात आयोजित करतात. परंतू मागाठाणेत 1500 गंगा भागीरथ महिलांना साडीचोळी देवून यथोचित सत्कार करून एक अनोखा कार्यक्रम काल रात्री आयोजित केला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस आणि शिवजयंतीचे औचित्य साधून मागाठाणे विधानसभा क्षेत्राचे शिवसेनेचे आमदार व विभागप्रमुख प्रकाश सुर्वे यांनी 1500 गंगा भागीरथ महिलांचा यथोचित सत्कार व हळदीकुंकू समारंभाचे दहिसर (पूर्व) संभाजी नगर येथील आमदार प्रकाश सुर्वे यांच्या नवीन कार्यालयात हा सत्कार सोहळा आयोजित केला होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस सेवापूर्ती सोहळा म्हणून गंगा भागीरथ महिलांचा  सत्कार,तरुणांसाठी रोजगार मेळावा, रक्तदान शिबीर,10 वी व 12 वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेला लागणारे पॅड, पेन आदी साहित्य वाटप आदी विविध उपक्रम राबवले होते.गंगा भागीरथ महिलांचा समाजात योग्य मान सन्मान होण्यासाठी या सोहळ्याचे आयोजन केले होते अशी माहिती त्यांनी दिली. यावेळी आमदार व शिवसेना सचिव डॉ.मनीषा कायंदे,शिवसेना उपनेत्या शीतल म्हात्रे व आशा मामीडी आदी प्रमुख आथिती म्हणून उपस्थित होत्या. आज समाजात  गंगा भागीरथ महिलांना दुय्यम स्थान दिले जाते. मात्र त्यांचा योग्य सन्मान करून त्यांचाही मान सन्मान समाजाने ठेवला पाहिजे, त्यांना समाजाने अश्या सोहळ्यात सामील करून घेतले पाहिजे हा आदर्श आमदार प्रकाश सुर्वे यांनी घालून दिला याबद्दल या महिलांनी त्यांचे आभार व्यक्त केले. यावेळी युवा सेना कार्यकारणी सदस्य राज प्रकाश सुर्वे, महिला विभागप्रमुख मीना  पानमंद, मागाठाणेच्या महिला विधानसभा प्रमुख शीला गांगुर्डे, महिला विधानसभा संघटक मनीषा सावंत, सर्व महिला उपविभागसंघटक, महिला विधानसभा संघटक, महिला शाखा संघटक आणि पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :मुंबईविधान भवन