नोएडाच्या धर्तीवर मालाड मध्ये साकारणार पाहिले वैदिक थीम पार्क

By मनोहर कुंभेजकर | Published: October 26, 2023 08:23 PM2023-10-26T20:23:00+5:302023-10-26T20:23:07+5:30

मालाडाच्या नियोजित वैदिक थीम पार्क मधील 63 अतिक्रमणे पालिकेने केली दूर

A Vedic theme park on the lines of Noida will be built in Malad | नोएडाच्या धर्तीवर मालाड मध्ये साकारणार पाहिले वैदिक थीम पार्क

नोएडाच्या धर्तीवर मालाड मध्ये साकारणार पाहिले वैदिक थीम पार्क

मनोहर कुंभेजकर

मुंबई-पी/उत्तर प्रभागातील अथर्व महाविद्यालयासमोर मार्वे रोड येथील प्लॉट क्र.7 येथे सुमारे २७९७२ चौ.मीटर. (6.91 एकर) जागेवर नोएडाच्या धर्तीवर मुंबईतील पाहिले वैदिक थीम पार्क साकार होणार आहे.

या भूखंडांची मालकी उपनगर  जिल्हाधिकारी यांच्या कडे होती.येथील सदर आरजी व पीजी प्लॉट थीम वैदिक पार्कच्या विकासासाठी दि,14 जुलै रोजी त्यांनी पालिकेकडे जसा आहे तसा पालिकेकडे सुपूर्द केला. गेल्या २० वर्षांपासून या भूखंडावर बेकायदा फर्निचरच्या दुकानांनी अतिक्रमण केले होते. पालिकेने जुलै 2023 मध्ये भूखंडावरील सर्व संरचनांना नोटिसा बजावल्या. वैध कागदपत्रांसह फक्त 8 दुकाने सापडली आणि त्यांना नियमानुसार पर्यायी जागा किंवा आर्थिक भरपाई दिली जाणार आहे. आज येथील सर्व 63 फर्निचरची दुकाने व झोपडपट्टी व इतर अतिक्रमणे पाडून संपूर्ण 6.91 एकर भूखंड अतिक्रमणमुक्त करण्यात आला
अशी माहिती पी उत्तर विभागाचे सहायक आयुक्त किरण दिघावकर यांनी लोकमतला दिली.

आज एक कार्यकारी अभियंता, दोन सहाय्यक अभियंता, पाच उपअभियंता, सात कनिष्ठ अभियंता यांना 62 कामगारांसह कामावर येथे तैनात ठेवले होते. एकूण 30 पोलीस घटनास्थळी उपस्थित होते. सदर बांधकाम पाडण्यासाठी एक मोठा पोकलेन, तीन जेसीबी, नऊ डंबर वापरण्यात आले.  घटनास्थळावरून कमीत कमी 50-60 डंपर भंगार उचलले जाणार असून सदर जागा आता बॅरिकेड्सने संरक्षित केली जाईल.सर्व बांधकामे अतिक्रमण मुक्त केल्यावर पलगेचच कंपाउंड वॉलचे बांधकाम सुरू केले जाणार आहे.उत्तर मुंबईचे स्थानिक खासदार गोपाळ शेट्टी यांच्या विनंतीनुसार येथे वैदिक थीम पार्क बांधण्याचा प्रस्ताव 
असल्याची माहिती किरण दिघावकर यांनी लोकमतला दिली.

 याबाबत खासदार गोपाळ शेट्टी यांनी सांगितले की,येथे नोआडाच्या धर्तीवर येथे वैदिक थीम पार्क उभारावे म्हणून मी गेली 9 वर्षे महापालिका व उपनगर जिल्ह्यधिकारी यांच्या कडे पत्रव्यवहार व संबंधितांकडे पाठपुरावा केला .आपल्या प्रयत्नांना यश येवून दि,14 जुलै 2023 रोजी उपनगर जिल्हाधिकाऱ्यांनी सदर भूखंड महापालिकेला हस्तांतरित केला.आता पालिका प्रशासनाने लवकर येथे सर्व मुंबईकरांना आणि येथे येणाऱ्या पर्यटकांना अभिमान वाटेल असे वैदिक थीम पार्क विकसित करावे अशी मागणी त्यांनी केली.आणि येथील अतिक्रमण मुक्त केल्याबद्धल त्यांनी दिघावकर यांचे त्यांनी अभिनंदन केले.

Web Title: A Vedic theme park on the lines of Noida will be built in Malad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.