Join us  

पदवीधरमधील विजय अपप्रचाराचे बारा वाजवेल, उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2024 10:01 AM

Devendra Fadnavis : लोकसभा निवडणुकीत फेक नरेटिव्हचा अर्थात अपप्रचाराचा मुकाबला करण्यात कमी पडलो; पण अपप्रचार एकदाच चालतो, तो वारंवार कामी येत नाही. लोकसभेच्या निकालानंतर भाजप उसळी मारून पुन्हा विजयी होईल. अपप्रचाराच्या विपरीत परिस्थितीतही भाजपने आपले स्थान राखले आहे.

 मुंबई - लोकसभा निवडणुकीत फेक नरेटिव्हचा अर्थात अपप्रचाराचा मुकाबला करण्यात कमी पडलो; पण अपप्रचार एकदाच चालतो, तो वारंवार कामी येत नाही. लोकसभेच्या निकालानंतर भाजप उसळी मारून पुन्हा विजयी होईल. अपप्रचाराच्या विपरीत परिस्थितीतही भाजपने आपले स्थान राखले आहे. मुंबई पदवीधर मतदारसंघातील भाजपचा विजय हा आमच्या विरोधातील अपप्रचाराच्या मोहिमेचे बारा वाजविणारा असेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी व्यक्त केला.

विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात आयोजित भाजपच्या विजय संकल्प मेळाव्यात फडणवीस बोलत होते. यावेळी मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, मंत्री मंगलप्रभात लोढा, पदवीधरचे उमेदवार किरण शेलार यांच्यासह मुंबईतील भाजपचे सर्व आमदार, पदाधिकारी उपस्थित होते.  यावेळी फडणवीस म्हणाले, निवडणूक हरतो तेव्हा नेत्याची खऱ्या अर्थाने पारख होते. अशा वेळी खचून न जाता इतिहासातून शिकायचे असते, पुढे जायचे असते. 

टॅग्स :देवेंद्र फडणवीसलोकसभा निवडणूक २०२४ निकालविधान परिषद निवडणूक 2024भाजपामहायुती