पत्नी रिकामी बसून पतीकडून भरणपोषण मागू शकत नाही; कर्नाटक उच्च न्यायालय

By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2023 10:26 AM2023-07-07T10:26:02+5:302023-07-07T10:26:12+5:30

कौटुंबिक हिंसाचार कायद्यांतर्गत पतीकडून भरणपोषणासाठी तिने न्यायालयात अर्ज दाखल केला.

A wife cannot sit idle and demand maintenance from her husband | पत्नी रिकामी बसून पतीकडून भरणपोषण मागू शकत नाही; कर्नाटक उच्च न्यायालय

पत्नी रिकामी बसून पतीकडून भरणपोषण मागू शकत नाही; कर्नाटक उच्च न्यायालय

googlenewsNext

- डॉ. खुशालचंद बाहेती

मुंबई : आपला उदरनिर्वाह करण्यासाठी पत्नीने स्वत: प्रयत्न केले पाहिजेत. निष्क्रीय बसून ती विभक्त पतीकडून उदरनिर्वाहाचा संपूर्ण खर्च मागू शकत नाही, असे कर्नाटक उच्च न्यायालयाने म्हटले आहे. लग्नानंतर पती-पत्नीमध्ये मतभेद निर्माण झाले. पत्नी पती, सासू आणि अविवाहित नणंदेसोबत राहण्यास तयार नव्हती. पतीचे घर सोडून ती आईसोबत राहू लागली. ती लग्नाआधी नोकरी करून कमावत होती. आता मात्र रिकामीच बसून होती.

कौटुंबिक हिंसाचार कायद्यांतर्गत पतीकडून भरणपोषणासाठी तिने न्यायालयात अर्ज दाखल केला. न्यायालयाने १० हजार रुपये महिना भरणपोषणासाठी आणि ३ लाख रुपये भरपाई मंजूर केली. पतीने याला सेशन कोर्टात आव्हान दिले. कोर्टाने भरणपोषण १० हजारांवरून ५ हजारांवर आणि नुकसानभरपाई ३ लाखांवरून २ लाखांवर आणली. पत्नीने याविरुद्ध उच्च न्यायालयात अपील केले. भरणपोषणासाठी ५ हजार रुपये व भरपाई २ लाख रुपये अपुरी असल्याचे तिचे म्हणणे होते. लग्नापूर्वी काम करणारी महिला सध्या का काम करत नाही ? प्रोव्हिजन स्टोअर्स चालविणाऱ्या पतीवर आई आणि अविवाहित बहिणीची जबाबदारी आहे, असे म्हणत उच्च न्यायालयाने पत्नीची याचिका फेटाळली.

नोंदविलेली निरीक्षणे
पत्नी निष्क्रीय बसून सोडलेल्या पतीकडून संपूर्ण देखभालीची अपेक्षा करू शकत नाही.स्वत:च्या उदरनिर्वाहासाठी प्रयत्न करण्याचे पत्नीवर कायदेशीर बंधन.पतीकडून पत्नीला आधारभूत देखभाल खर्च मिळू शकतो.  - न्या. राजेंद्र बदामीकर

Web Title: A wife cannot sit idle and demand maintenance from her husband

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.