Join us  

पतीच्या निधनानंतर महिलेचा उल्लेख ‘गंगा भागिरथी’ असा करण्यात यावा; मंगलप्रभात लोढा यांचा आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2023 7:27 AM

पतीच्या निधनानंतर महिलेचा उल्लेख ‘विधवा’ असा न करता ‘गंगा भागिरथी’ असा करावा, असे लेखी आदेश महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिले आहेत. 

मुंबई :

पतीच्या निधनानंतर महिलेचा उल्लेख ‘विधवा’ असा न करता ‘गंगा भागिरथी’ असा करावा, असे लेखी आदेश महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिले आहेत. 

महिला व बालविकास विभागाच्या प्रधान सचिवांना दिलेल्या या पत्रात म्हटले आहे, की “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘अपंग’ऐवजी ‘दिव्यांग’ ही संकल्पना जाहीर केल्याने दिव्यांग बांधवांना समाजात मानाचे स्थान मिळाले , त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन आमूलाग्र बदलला. याच धर्तीवर विधवा महिलांना सन्मान मिळवून देण्याकरिता ‘विधवा’ऐवजी ‘गंगा भागिरथी’ (गं. भा.) हा शब्द वापरण्याबाबतचे परिपूर्ण प्रस्ताव तयार करून चर्चा करावी.”  अशा महिलांचीही समाजात प्रतिष्ठा राहावी, या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. 

अंतिम निर्णय चर्चेनंतरच...- याबाबत मंगलप्रभात लोढा पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, याबाबत कोणताही अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही. - सध्या फक्त प्रस्ताव तयार करून चर्चा करण्याची सूचना प्रधान सचिवांना केली आहे. - चर्चेनंतरच याबाबत अंतिम निर्णय घेण्यात येईल. महाराष्ट्रातील विधवा महिलांना सन्मान मिळवून देण्यासाठीचा हा एक प्रयत्न असल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले.

टॅग्स :मंगलप्रभात लोढा