राज्यातील ७६ टक्के विद्यार्थ्यांच्या आधारची माहिती अप टू डेट ...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:07 AM2021-05-14T04:07:08+5:302021-05-14T04:07:08+5:30

अद्याप २३ टक्के विद्यार्थ्यांची माहिती अद्ययावत होणे बाकी, विभागीय संचालकांकडून मागविला खुलासा लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राज्यातील सर्व ...

Aadhaar information of 76% students in the state up to date ...! | राज्यातील ७६ टक्के विद्यार्थ्यांच्या आधारची माहिती अप टू डेट ...!

राज्यातील ७६ टक्के विद्यार्थ्यांच्या आधारची माहिती अप टू डेट ...!

Next

अद्याप २३ टक्के विद्यार्थ्यांची माहिती अद्ययावत होणे बाकी, विभागीय संचालकांकडून मागविला खुलासा

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई :

राज्यातील सर्व माध्यमिक व व्यवस्थापनाच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना आधार कार्डशी जोडण्याचा निर्णय शासनाने जून २०१३ मध्ये घेतला होता. त्यानुसार राज्यातील सर्व शाळांमध्ये अविरतपणे ''सरल'' प्रणालीमध्ये विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक अद्ययावत करण्याचे काम सुरू आहे. ११ मे २०२१ पर्यंतच्या आकडेवारीनुसार राज्यातील एकूण २ कोटी १५ लाख ७६ हजार ५१६ इतक्या विद्यार्थ्यांपैकी १ कोटी ६४ लाख ७५ हजार ८९८ इतक्या विद्यार्थ्यांची आधार क्रमांकाची माहिती सरल प्रणालीमध्ये अद्ययावत करण्यात आली आहे. अजूनही ५१ लाख ६१८ इतक्या विद्यार्थ्यांची माहिती अद्ययावत करणे बाकी आहे. राज्यातील एकूण ७६.३८ टक्के विद्यार्थ्यांची माहिती अद्ययावत करण्यात आली असून, २३.६२ टक्के विद्यार्थ्यांची माहिती अद्ययावत करणे बाकी आहे.

कोविड १९च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सद्यस्थितीत राज्यातील शाळांमधील आधार अद्ययावतीकरणाची प्रक्रिया पुढील निर्देशांपर्यंत स्थगित करण्यात आली असून, त्यासंबंधित आधार नोंदणी संच सुस्थितीत जतन करून ठेवण्याच्या सूचना प्राथमिक शिक्षण संचालकांनी राज्यातील सर्व विभागीय उपसंचालक, शिक्षणाधिकारी यांना दिल्या आहेत. दरम्यान, राज्यातील सर्व विभागीय उपसंचालक, शिक्षणाधिकारी यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील जिल्ह्यांचा आढावा घेऊन ज्या जिल्ह्यांमध्ये राज्याच्या सरासरीपेक्षा कमी कामकाज झाले आहे, त्या जिल्ह्यांचा शिक्षणाधिकाऱ्यांकडून याबाबत खुलासा घेण्यात यावा, अशा सूचना प्राथमिक शिक्षण संचालकांनी दिल्या आहेत. राज्याच्या सरासरीपेक्षा कमी सरासरी असलेले गडचिरोली, अमरावती, लातूर, परभणी, रायगड, अकोला, पालघर, नाशिक, वाशिम, पुणे, ठाणे, औरंगाबाद आदी जिल्हे आहेत. ९० टक्क्यांपेक्षा अधिक आधार अद्ययावतीकरण झालेल्या जिल्ह्यांमध्ये सिंधुदुर्ग, भांडारा, वर्धा, जळगाव, गोंदिया, चंद्रपूर , बुलडाणा यांचा समावेश आहे.

लॉकडाऊनचाही परिणाम

दरम्यान, कोरोनामुळे गेल्या वर्षभरात लॉकडाऊनमुळे शाळा बंद आहेत. अनेक शिक्षकही वर्क फ्रॉम होम करत आहेत. त्यामुळे मुलांचे आधार कार्ड काढणे शक्य झाले नसल्याचे व एकूणच त्यांचा परिणाम आधार क्रमांक ''सरल''मध्ये अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेवर झाला असल्याच्या प्रतिक्रिया शिक्षक, मुख्याध्यापक देत आहेत.

मुंबईत ७६.९९ % आधार अद्ययावतीकरण

राज्याच्या शिक्षण संचालनालयाच्या आकडेवारीनुसार मुंबई जिल्ह्यात आतापर्यंत ७६.९९ % विद्यार्थ्यांचे आधार अद्ययावतीकरण झाले आहे. मुंबईतील एकूण विद्यार्थीसंख्या १७ लाख ९१ हजार ४३९ इतकी असून, त्यापैकी १३ लाख ७९ हजार २४३ विद्यार्थ्यांची आधार माहिती अद्ययावत झालेली आहे. ४ लाख १२ हजार १९६ विद्यार्थ्यांची माहिती अद्ययावत होणे अद्याप बाकी आहे.

चौकट

विभागनिहाय आधार अद्ययावतीकरण

विभाग - एकूण विद्यार्थीसंख्या - माहिती अद्ययावत केलेली विद्यार्थीसंख्या- माहिती अद्ययावत नसलेली

नाशिक- २९५५८१६- २६३६५९७ (८९.२० ) - ३१९२१९

कोल्हापूर - २०११६९३- १६७३३२१ (८३.१८ )- ३३८३७२

नागपूर - २०४३८०२- १६५३९२४ (८०.९२)- ३८९८७८

लातूर - १५२२००५- १२२४४०४ (८०.४५) -२९७६०१

अमरावती - २०९२०६७- १६३७९३८ (७८.२९)- ४५४१२९

पुणे - ३६६२९९४- २७३०१५८ (७४.५३)- ९३२८३६

औरन्न्गाबाद - २६१४२११- १८१३५२९ (६९.३७) ८००६८२

मुंबई - ४६८३७४४- ३११६७९७ (६६.५४)- १५६६९४७

एकूण - २१५८६३३२- १६४८६६६८ (७६.३८)- ५०९९६६४

Web Title: Aadhaar information of 76% students in the state up to date ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.