Join us

म्हाडाच्या घरासाठी आधार, पॅन अपलोड केले का? कोकण मंडळाची प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य योजना

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2024 4:17 PM

प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य ही योजना त्या-त्या योजनेतील सदनिका उपलब्ध असेपर्यंतच सुरू राहील, असे म्हाडाने स्पष्ट केले आहे. 

मुंबई : म्हाडाच्या कोकण मंडळाच्या प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य योजने (थेट विक्री) अंतर्गत ११ हजार १८७ सदनिका आहेत. त्यासाठी  https://lottery.mhada.gov.i-   या वेबसाइटवर नोंदणी करून सदनिकेसाठी अर्ज भरायचा आहे. अर्ज भरताना  अर्जदारांना आधार कार्ड आणि पॅन कार्ड प्रणालीमध्ये अपलोड करायचे आहे. आधार कार्डशी संलग्न असलेला मोबाइल क्रमांक व पासपोर्ट साइज फोटो ऑनलाइन सादर  करायचा आहे. नोंदणी प्रक्रियेनंतर अर्जदाराला इच्छित सदनिकेकरिता ऑनलाइन पेमेंट करता येईल. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य ही योजना त्या-त्या योजनेतील सदनिका उपलब्ध असेपर्यंतच सुरू राहील, असे म्हाडाने स्पष्ट केले आहे. 

दोन घटकांत सोडत - म्हाडाची सोडत दोन घटकांमध्ये विभागण्यात आली आहे. सोडतीत प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या योजनेंतर्गत ११,१८७ सदनिका आहेत. यामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेतील अत्यल्प उत्पन्न गटासाठी ९,८८३ सदनिका, १५ टक्के एकात्मिक शहर योजनेंतर्गत ५१२ सदनिका, २० टक्के सर्वसमावेशक योजनेंतर्गत एकूण ६६१ सदनिका आहेत.

- कोकण मंडळातर्फे उभारण्यात आलेल्या विखुरलेल्या १३१ सदनिका आहेत. दुसऱ्या घटकमध्ये १,४३९ सदनिकांचा समावेश आहे. यामध्ये २० टक्के सर्वसमावेशक योजनेंतर्गत एकूण ५९४  सदनिका आहेत. कोंकण मंडळातर्फे उभारण्यात आलेल्या विखुरलेल्या ६०७  सदनिका आणि ११७ भूखंड आहेत.

एजंट नाहीतसोडत ऑनलाइन आहे. यात मानवी हस्तक्षेप नाही. सदनिकांच्या विक्रीकरिता प्रतिनिधी, सल्लागार आणि प्रॉपर्टी एजंट नाहीत. अर्जदाराने कोणत्याही त्रयस्थ / दलाल / मध्यस्थ व्यक्तीच्या प्रलोभनांना बळी पडू नये. अशा प्रकारच्या गैरव्यवहारास अथवा फसवणुकीस म्हाडा जबाबदार राहणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

हेल्पलाइन -अडचणी सोडविण्यासाठी ०२२ - ६९४६८१०० या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा.

म्हाडाच्या https:// housi- g.mhada.gov.i-  या वेबसाइटवर अर्जनोंदणी प्रक्रिया आहे. अर्जदारांना माहिती देणारी मार्गदर्शनपर पुस्तिका, ध्वनीचित्रफिती, हेल्प फाइल आणि हेल्प साइट यांचे दुवे वेबसाइटवर आहेत. सोडत प्रक्रियेत सहभाग घेण्यापूर्वी अर्जदारांनी या मार्गदर्शनपर माहितीचे अवलोकन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.- रेवती गायकर, मुख्य अधिकारी, कोकण मंडळ

टॅग्स :म्हाडासुंदर गृहनियोजन