Aaditya Thackeray: वेदांतानंतर आणखी एक प्रकल्प गेला, आदित्य ठाकरेंनी सांगितला सरकारचा "उद्योग"
By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2022 06:47 PM2022-09-14T18:47:15+5:302022-09-14T18:50:43+5:30
वेदांत-फॉक्सकॉन प्रकल्पाच्या नुकसानीनंतर आणखी एक प्रकल्प महाराष्ट्र सरकारने गमावाला आहे.
मुंबई - वेदांता-फॉक्सकॉन ग्रुपचा १ लाख ५४ हजार कोटींचा प्रकल्प गुजरातला गेला आहे. या प्रकल्पातून १ लाख नोकऱ्या उपलब्ध होणार होत्या. सेमीकंडक्टर निर्मितीचा (vedanta semiconductor) हा प्रकल्प गुजरातला स्थापन करण्यासंदर्भात वेदांत-फॉक्सकॉन ग्रुप आणि गुजरात सरकारमध्ये करार झाला आहे. दरम्यान, हा प्रकल्प महाराष्ट्राऐवजी गुजरातल्या नेण्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. तसंच आरोप प्रत्यारोपांच्या फैरीही सुरू झाल्या आहेत. मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिल्यानंतर आदित्य ठाकरे यांनीही पत्रकार परिषदेतून पुन्हा शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे. तसेच, वेदांतासह आणखी एक प्रकल्प महाराष्ट्रातून गेल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.
वेदांत-फॉक्सकॉन प्रकल्पाच्या नुकसानीनंतर आणखी एक प्रकल्प महाराष्ट्र सरकारने गमावाला आहे. कारण, बल्क ड्रग पार्क या प्रकल्पाचा महाविकास आघाडी सरकारने योग्यरीत्या पाठपुरावा केला होता. मात्र, आता तो प्रोजेक्टही ३ राज्यांत गेला आहे. गुजरात, आंध्र प्रदेश आणि हिमाचल प्रदेशमध्ये आता या प्रकल्पाची उभारणी होणार आहे. राज्यातील सरकारची असंवैधानिक परिस्थीत आणि सरकारची विकास प्रकल्पांबाबत असलेल्या अभावामुळेच हा प्रकल्पही महाराष्ट्रातून गेल्याचे आदित्य ठाकरेंनी ट्विट करुन सांगितले. विशेष म्हणजे केंद्र सरकारनेही या प्रकल्पाला तीन राज्यांसाठी तत्वत: मंजूरी दिल्याचे आदित्य यांनी आपल्या ट्विटमधून सांगितलं आहे.
After Vedanta- Foxconn loss, the Bulk Drug Park that had been meritoriously pursued by the MVA Government, has been lost to 3 States- Gujarat, Andhra Pradesh & Himachal Pradesh, by the current unconstitutional dispensation in our State, due to its lack of interest in development pic.twitter.com/xJh0NeG08I
— Aaditya Thackeray (@AUThackeray) September 14, 2022
माजी मंत्री आणि शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी आज पुन्हा पत्रकार परिषद घेत राज्य सरकारवर टीका केली. फॉक्सकॉनबाबत व्हॉट्सअॅपवर खोटो मेसेज फिरवण्याचे काम सुरु आहे. मुख्यमंत्र्यांनी अद्याप सविस्तर उत्तर दिलं नाही. सरकारने खुलासाही केला नाही. प्रकल्प महाराष्ट्राबाहेर का गेला?, याचं उत्तर मिळालं नाही, असं आदित्य ठाकरे म्हणाले. तसेच ४० गद्दारांनी सरकार पाडलं म्हणून प्रकल्प मागे राहिला. हे घडलं तेव्हा मुख्यमंत्री गणेश दर्शनात व्यस्त होते. त्यामुळे आता तरुणांच्या बेरोजगारीची जबाबदारी कोण घेणार?, असा सवाल आदित्य ठाकरेंनी उपस्थित केला आहे.
उद्योगमंत्र्यांनी थोडा अभ्यास करावा - ठाकरे
आदित्य ठाकरेंनी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यावर पटलवार करत त्यांना सवाल केला आहे. उद्योगमंत्र्यांना त्यांचं खातं थोडंस चुकीचं ब्रीफ करत आहे. त्यांनी थोडा अभ्यास करावा, त्याचं मत्रालय थोडं वेगळं होत. त्यांनी देसाईसाहेबांचं किंवा माझं ट्विटर पाहिलं असतं, काम बघितलं असतं तर त्यांना ते कळालं असतं किवा ते तिथे गेलेही नसते, असे म्हणत आदित्य ठाकरेंनी उदय सामंत यांच्यावर पलटवार केला, तसेच, बाजीगर चित्रपटातील एक डॉयलॉग होता, हारकर जीतनेवाले को बाजीगर कहते है. पण, इथे जितकर हारनेवालें को खोके सरकार कहते है, असे म्हणत वेदांता प्रकल्प महाराष्ट्रातून गेल्यामुळे शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे.