मुंबई : युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या जनआशिर्वाद यात्रेच्या पहिल्या टप्प्याची आज घोषणा करण्यात आली.
येत्या १८ जुलैला जळगाव येथून जनाशिर्वाद यात्रा सुरू होईल. त्यानंतर तारखेला धुळे मालेगाव, २० तारखेला नाशिक शहर, २१ तारखेला नाशिक ग्रामीण आणि नगर जिल्ह्यात तर २२ तारखेला नगर, श्रीरामपूर आणि शिर्डीत या जनआशिर्वाद यात्रेचा पहिला टप्पा पूर्ण होईल, अशी माहिती युवासेनेचे सरचिटणीस वरूण सरदेसाई यांनी दिली.
जन आशिर्वाद यात्रेदरम्यान प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघापर्यंत पोहोचण्याचा मानस असल्याचही सरदेसाई यांनी सांगितले. जिथे जिथे यात्रा पोहोचेल तेथील शिवसेना नेते, आमदार, पदाधिकारी उपस्थित राहतील. या दरम्यान आदित्य संवाद हा कार्यक्रम, कार्यकर्ता मेळाव्यांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे सरदेसाई यांनी सांगितले.
जनआशिर्वाद यात्रेच्या माध्यमातून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात आणि जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात आदित्य ठाकरे पोहोचतील. २२ जुलैला पहिला टप्पा पार पडल्यानंतर पुढील टप्प्यांचा कार्यक्रम जाहीर करण्यात येणार असल्याचेही वरूण सरदेसाई यांनी सांगितले.