मुंबई : लाखोंच्या ऐवजाचा शोध घेणा-या मुंबई पोलिसांवर सध्या खारमधून ७१ वर्षांच्या आजीबार्इंची चोरीला गेलेली ७ जपानी अंतर्वस्त्रे शोधण्याची वेळ आली आहे. या प्रकरणी आजीबाईने मोलकरणीवर चोरीचा संशय व्यक्त केला आहे.खार पश्चिमेतील उच्चभ्रू वसाहतीतील एका व्यावसायिक कुटुंबातील या आजीबार्इंनी गेल्या वर्षी जपानमधून ७ अंतर्वस्त्रे मागवली होती. त्यांच्याकडे जून २०१६मध्ये ३४ वर्षीय राधा (नावात बदल) घराकामासाठी लागली. तिच्यावर घरची जबाबदारी सोपवून आजीबाई बाहेर पडायच्या. काही दिवसांनी त्या कपाटात जपानी अंतर्वस्त्रे पाहण्यासाठी गेल्या तेव्हा अंतर्वस्त्रे गायब होती. दरम्यान, राधाही कामावर येणे बंद झाली. शोध घेऊनही अंतर्वस्त्रे न मिळाल्याने अखेर आजीबार्इंनी १० नोव्हेंबर रोजी खार पोलीस ठाण्यात तक्रार दिली.७ जपानी अंतर्वस्त्रे चोरीला गेल्याची तक्रार आहे, हे समजल्यावर पोलीसही अचंबित झाले. मात्र चोरी झालेली असल्यामुळे त्यांनी गुन्हा दाखल केला. जपानी अंतर्वस्त्रांसह दोन इम्पोर्टेड चाकूही चोरीला गेल्याचे आजीबार्इंनी तक्रारीत नमूद केले आहे. मोलकरणीने जून २०१६ ते २८ मार्च २०१७ दरम्यान ही अंतर्वस्त्रे लंपास केल्याचा संशय त्यांनी पोलिसांकडे वर्तविला. त्यानुसार या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याची माहिती खार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामचंद्र जाधव यांनी दिली.यापूर्वी सिनेअभिनेत्री सनी लिओनी हिची एका चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान ५० हजार रुपये किमतीची अंतर्वस्त्रे चोरीलागेली होती.
आजीबार्इंची ७ जपानी अंतर्वस्त्रे गेली चोरीला, खारमधील घटना : मोलकरणीनेच चोरी केल्याचा संशय
By मनीषा म्हात्रे | Published: November 17, 2017 3:37 AM