आली रे आली गांजा बहाद्दरच बारी आली, चित्रा वाघ यांची मलिकांवर बोचरी टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2021 05:51 PM2021-11-07T17:51:13+5:302021-11-07T17:52:35+5:30
भाजपा नेते राम कदम यांनी मलिक यांच्या पत्रकार परिषदेनंतर महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. तसेच, 25 कोटींची वसुली म्हणजे वाझे पार्ट 2 तर नाही ना, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
मुंबई - आर्यन खान(Aryan Khan) प्रकरणात मंत्री नवाब मलिक सातत्याने NCB च्या कारवाईवर प्रश्नचिन्ह निर्माण करत आहेत. आता या प्रकरणात मलिकांनी आर्यन खानचं अपहरण करुन शाहरुख खानकडून वसुली करायची होती. आर्यनला त्याच्या मित्रांनी क्रुझवर नेले होते असा दावा केला. त्याचसोबत सॅम डिसुझा आणि NCB अधिकाऱ्याच्या संभाषणाची क्लीप मलिकांनी जारी केली. तसेच, मोहीत भारतीय हा वानखेडेंचा माणूस असल्याचा आरोपही केला. त्यानंतर, भाजपा नेत्यांनी मलिक यांच्यावर निशाणा साधला आहे.
भाजपा नेते राम कदम यांनी मलिक यांच्या पत्रकार परिषदेनंतर महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. तसेच, 25 कोटींची वसुली म्हणजे वाझे पार्ट 2 तर नाही ना, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. दुसरीकडे, भाजपच्या महिला आघाडीच्या प्रमुख आणि राष्ट्रीय सदस्या चित्रा वाघ यांनीही मलिक यांच्यावर बोचरी टीका केली आहे. नवाब मलिकांची पत्रकार परिषद म्हणजे... ‘खोदा पहाड निकला चुहां...’, अशा शब्दात त्यांनी मलिक यांच्यावर निशाणा साधला. तसेच, ड्रग्ज व्यापार करणारे उंदीर कोणत्याही बिळात लपून बसले, तरी त्यांना शोधून काढण्याचं काम सरकारी यंत्रणा करणारच. यंत्रणेकडे असे अनेक सिंघम आहेत... आली रे आली गांजा बहाद्दरांची बारी आली, अशी बोचरी टीकाही वाघ यांनी केली.
नवाब मलिकांची पत्रकार परिषद म्हणजे... ‘खोदा पहाड निकला चुहां...’
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) November 7, 2021
पण ड्रग्ज व्यापार करणारे उंदीर कोणत्याही बिळात लपून बसले तरी त्यांना शोधून काढण्याचं काम सरकारी यंत्रणा करणारच.
यंत्रणेकडे असे अनेक सिंघम आहेत...
आली रे आली गांजा बहाद्दरांची बारी आली !@AmitShah@Dev_Fadnavis
काय म्हणाले मलिक
मोहित भारतीय हे या प्रकरणाचे मास्टर माईंड आहेत. ६ तारखेला माझी पत्रकार परिषद झाली त्यानंतर ७ तारखेला समीर वानखेडे आणि मोहित भारतीय दोघंही ओशिवरा येथील कब्रस्तानजवळ भेटले होते. ते दोघंही नशिबवान आहेत की, या भेटीचे व्हिडीओ मिळाले नाहीत कारण पोलिसांचा सीसीटीव्ही काम करत नव्हता. अभिनेता शाहरुख खानला धमकवण्यात येत असून त्याने पुढे यायला हवं. अन्यायाविरोधात सुरु असलेल्या माझ्या लढाईत सहभागी व्हावं असं आवाहन मलिकांनी केले आहे.
सॅम डिसुझा वानखेडेंच्या संपर्कात नव्हता
NCB अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, ज्या डिसुझा आणि वीवी सिंह यांच्यातील संभाषण नवाब मलिकांनी जारी केले. त्यात काहीही चुकीचं नाही. अधिकारी डिसुझा यांना फोनवरुन काहीही डिलीट करू नको. तुझा आयएमईआय नंबर माझ्याकडे आहे असा इशारा देत होते. समीर वानखेडे सॅम डिसुझाच्या संपर्कात नव्हता असं त्यांनी सांगितले आहे.