Join us

मनीष सिसोदिया यांच्यावरील कारवाईच्या निषेधार्थ आम आदमी पार्टीचे आंदोलन

By मनोहर कुंभेजकर | Published: February 26, 2023 8:43 PM

दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना अटक करण्यात आली आहे.

मुंबईआम आदमी पार्टीचे राष्ट्रीय नेते आणि दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या विरोधात केंद्रातील भाजप सरकारने सीबीआय मार्फत चुकीच्या पध्दतीने कारवाई केल्याचा निषेधार्थ आज आम आदमी पार्टी मुंबईच्या अध्यक्षा प्रीती शर्मा मेनन यांच्या नेतृत्वाखाली आज मुंबईतील सीएसटी रेल्वे स्थानकाच्या बाहेर आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात आम आदमी पार्टी मुंबईचे कार्याध्यक्ष रूबेन मस्करेन्हस, उपाध्यक्ष पायस व्हर्गिस, द्विजेंद्र तिवारी, संजय बेडीया, महमूद देशमुख आणि आम आदमी पार्टी मुंबईचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

प्रीती मेनन म्हणाल्या की, अदानी समूहाने करोडो रुपयांचा घोटाळा करून भारताच्या अर्थव्यवस्थेवर संकट आणले. त्या गौतम अदानींवर भाजप सरकारने सीबीआय तर्फे करवाई केली नाही. भाजपचे नेते त्यावर साधे भाष्य सुद्धा करत नाहीत. पण आज दिल्लीत उपमुख्यमंत्री म्हणून शैक्षणिक क्षेत्रात क्रांती निर्माण करणाऱ्या मनीष सिसोदिया यांच्यावर कोणताही आधार नसताना खोट्या प्रकरणामध्ये सीबीआय मार्फत कारवाई केली जाते.  केंद्रातील भाजप सरकारमार्फत केले जाणारे खालच्या पातळीवरचे घाणेरडे राजकारण आहे.

आम आदमी पार्टी भारतात वेगाने वाढत आहे. पक्ष म्हणून आम आदमी पार्टीला चांगले यश मिळत आहे. किंबहुना केवळ आम आदमी पार्टी हा एकच पक्ष आहे, जो भाजपला पराभूत करू शकतो, याची भीती व पुरेपूर जाणीव भाजपला आहे. या भीतीमुळेच आम आदमी पार्टीला भाजप सरकार लक्ष्य करत आहे व आम आदमी पक्षाविरोधात खोट्या प्रकरणांच्या आधारावर सीबीआय सारख्या संस्थांमार्फत कारवाई करत आहे, अस आरोप त्यांनी केला. केंद्रा सरकारने जर  खोट्या प्रकरणामध्ये एका मनीष सिसोदियाला अटक कराल, तर असे हजारो मनिष सिसोदिया तुमच्या अन्यायाविरोधात व भ्रष्टाचाराविरोधात उभे राहतील असा इशारा प्रीती  मेनन यांनी दिला.

टॅग्स :आपमनीष सिसोदियामुंबई