Join us

"केंद्र सरकारकडून आपली तिजोरी भरण्याकरीता इंधन दरवाढ;" आम आदमी पक्षाचा मुंबईत रस्ता रोको

By ऑनलाइन लोकमत | Published: April 07, 2022 5:06 PM

"आम आदमीचे इंधन दर वाढीमुळे कंबरडं मोडल असून भाजप पक्ष आपला 'स्थापना' दिवस साजरा करण्यात व्यस्त आहे," 'आप'चा आरोप

'मुंबई-कोरोना महामारीमुळे झळ सोसत असलेले नागरिक आता इंधन दर वाढीमुळे त्रस्त आहेत. केंद्र सरकार व महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारने सर्व सामान्यांच्या खिशावर एकप्रकारे टाकलेला हा दरोडाच आहे. केंद्र सरकारने तिजोरी भरण्यासाठी ही दरवाढ केली' असल्याचं म्हणत केंद्रातील भाजपा सरकार व महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारचा निषेध करण्यासाठी आम आदमी पार्टीच्या वतीने मुंबई महानगर पालिका मुख्यालयासमोरील जंक्शनवर चक्का जाम करत रस्ता रोको केला. यावेळी शेकडो आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते उपस्थित होते. त्यांनी ‘मोदी सरकार हाय हाय..’ च्या घोषणांनी महानगरपालिका मुख्यालयासमोरील जंक्शनचा परिसर दणादणू सोडला. निषेधाचाच एक भाग म्हणून हातगाडीवर एक दुचाकी ठेवण्यात आली होती. 

"आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत सातत्याने वाढ होत आहे. याचा परिणाम देशांतर्गत बाजारात इंधनाच्या दरावरही झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत सातत्याने वाढ होत आहे. कोरोनामुळे झळ सोसत असलेले नागरिक आधीच भरडला गेला असून त्यात त्याला इंधन दरवाढीचा मारा सहन करवा लागत आहे. हा निर्लज्जपणाचा कळस असून केंद्र सरकार आपली तिजोरी भरण्याकरीता इंधन दरवाढ केली आहे. आम आदमीचे इंधन दर वाढीमुळे कंबरडं मोडल असून भाजप पक्ष आपला 'स्थापना' दिवस साजरा करण्यात व्यस्त आहे. भाजप सरकार वास्तवापासून खूप दूर आहे," असा आरोप आम आदमी पार्टीचे मुंबई कार्याध्यक्ष रुबेन मस्करेन्हास यांनी केला. 

"मुंबईत पेट्रोलचे दर अनुक्रमे १२०.५१ रूपये तर डिझेलचे दर १०४.७७  रुपयांवर पोहोचले आहेत. जर आप सरकारच्या दिल्लीत पेट्रोलची किंमत १०५ रुपये असू शकते तर  महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार इंधनाच्या किंमतीत समानता का आणत नाही. त्यांनी तात्काळ इंधन दरा मध्ये समानता आणावी," अशी मागणी आम आदमी पार्टीच्या राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य आणि मुंबई प्रभारी प्रीती शर्मा- मेनन यांनी केली. 

टॅग्स :आपभाजपामहाविकास आघाडीपेट्रोल