Join us

जुनी पेन्शन योजनेच्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाला आम आदमी पार्टीचा पाठिंबा

By मनोहर कुंभेजकर | Published: March 13, 2023 8:09 PM

जुनी पेन्शन योजना पूर्ववत लागू करण्यात यावी यासाठी सरकारी कर्मचारी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.

मुंबईजुनी पेन्शन योजना पूर्ववत लागू करण्यात यावी यासाठी सरकारी कर्मचारी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. त्यासाठी जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी दि,१४ मार्च  पासून सरकारी कर्मचाऱ्यांच्या अनेक संघटनांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे.  सरकारी कर्मचाऱ्यांच्या मागणीला तसेच त्यांच्या आंदोलनाला आम आदमी पार्टीचा संपूर्ण पाठिंबा आहे अशी माहिती आम आदमी पार्टीच्या मुंबई अध्यक्षा प्रीती शर्मा मेनन यांनी दिली. 

नवीन पेन्शन योजना २००५ नंतर सेवेत रुजू झालेल्या सरकारी कर्मचार्‍यांना लागू आहे. या नवीन योजनेमधील तरतुदींनुसार, कर्मचार्‍यांच्या पगारातून कपातीचा काही भाग शेअर मार्केटमध्ये गुंतवला जातो.  त्यामुळे सेवानिवृत्तीनंतरचे पेआउट हे निवृत्तीच्या वेळी शेअर बाजाराच्या परिस्थितीवर अवलंबून असते. ज्या पद्धतीने शेयर बाजारात सरकारी गुंतवणूक होते, ते आपण सर्वांनी पाहिले आहे, ज्यामुळे मूल्याचे अवमूल्यन होत असते. या कारणांमुळे नवीन पेन्शन योजनेला विरोध जोर धरू लागला आहे.

आम आदमी पार्टी चे महाराष्ट्र संघटन मंत्री विजय कुंभार म्हणाले की, आम आदमी पार्टीने पंजाबमध्ये निवडणूक प्रचारादरम्यान सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना पुन्हा सुरू करण्याबाबत आश्वासन दिले होते. निवडून आल्यावर आम्ही आमच्या आश्वासनाची पूर्तता करत जुनी पेन्शन योजना अमलात आणली.

जुनी पेन्शन योजना पूर्ववत सुरू व्हावी यासाठी शासकीय कर्मचाऱ्यांनी ठिकठिकाणी वेगवेगळ्या संस्थांमार्फत आंदोलन करत आहेत.  जुनी पेन्शन योजना पूर्ववत सुरू करण्याच्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या मागणीला आम आदमी पार्टीचा सदैव पाठिंबा राहील, असे मत आम आदमी पार्टी चे महाराष्ट्र सचिव धनंजय शिंदे यांनी यांनी व्यक्त केले.

टॅग्स :मुंबईआंदोलन