आरे जंगल बिल्डरांच्या घशात घालण्याचा सरकारचा कट? आगीच्या घटनांवरून ‘आप’चा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 09:47 AM2021-03-20T09:47:16+5:302021-03-20T09:47:25+5:30

‘आरे’च्या जंगलात लागलेल्या आगींनी अनेक अनुत्तरित प्रश्नांना वाचा फोडली आहे. आरे हे संरक्षित जंगल आहे. जे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा भाग आहे. हा अत्यंत नाजूक पर्यावरणीय भाग आहे.  

aam aadmi party targets State government on the issue of Aarey forest Mumbai | आरे जंगल बिल्डरांच्या घशात घालण्याचा सरकारचा कट? आगीच्या घटनांवरून ‘आप’चा आरोप

आरे जंगल बिल्डरांच्या घशात घालण्याचा सरकारचा कट? आगीच्या घटनांवरून ‘आप’चा आरोप

Next

मुंबई:  गेल्या दोन महिन्यात ‘आरे’च्या जंगलात लागलेल्या २१ आगींच्या बाबतीत सरकार निष्क्रीय असून, याचा ‘आप’ने निषेध केला आहे. या व्यतिरिक्त आता पर्यावरण मंत्री कुठे आहेत? असे म्हणत आरे वाचविण्यासाठी करण्यात आलेल्या दाव्यांचे काय झाले? असाही सवाल ‘आप’ने केला आहे. येथे आगी लावत मुबंईकरांच्या पाठीत सुरा खूपसून; आरेचे जंगल बिल्डरांच्या ताब्यात देत मुंबईकरांना फसविण्याचा डाव आहे का? अशी टीका करत संताप व्यक्त करण्यात आला आहे.

‘आरे’च्या जंगलात लागलेल्या आगींनी अनेक अनुत्तरित प्रश्नांना वाचा फोडली आहे. आरे हे संरक्षित जंगल आहे. जे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा भाग आहे. हा अत्यंत नाजूक पर्यावरणीय भाग आहे.  

जगातले शहरात वसलेले एकमेव जंगल आहे.  ‘आरे’चा भाग हा भूजलासाठी महत्त्वाचा पाणलोट क्षेत्र आहे. शिवाय मुंबईतील मिठी आणि ओशिवरा या दोन नद्यांचे मूळ क्षेत्र या भागात आहे. याच्यासोबत हा भाग जैवविविधतेचे माहेरघर आहे. ‘आरे’च्या या आगींबाबत महाराष्ट्र सरकार आणि मुंबई महापालिका काहीही करत नाही. जंगल नष्ट करून जमिनींवर आक्रमण करण्याचे काम सुरु आहे. याकडे कानाडोळा केला जात आहे, अशी टीका करण्यात आली आहे. जंगल वाचायला हवे, अशी मागणी आहे. 

या ठिकाणी घडल्या आग लागण्याच्या घटना
- १. १८ मार्च - रॉयल पाल्म्स, इम्पेरियर पॅलेस हॉटेल स्लोप
- २. १८ मार्च - युनिट नंबर ३२
- ३. १७ मार्च - आरे डेअरी आणि युनिट १६ शाळेच्या मध्ये
- ४. १६ मार्च - युनिट नंबर ३
- ५. १५ मार्च - विहार तळे रोड परिसरात दिवसा लागलेली आग
- ६. १४ मार्च - आरे डेअरीच्या युनिट १६ परिसरात लागलेली आग
- ७. १४ मार्च - कोणत्या तरी अज्ञात ठिकाणावरून आलेला धूर
- ८. १३ मार्च - आरे डेअरी बंगल्यानजीक रात्री लागलेली आग.
- ९. ११ मार्च - युनिट २२, मेट्रो शेडच्या विरूद्ध बाजूला, पोलीस कॅमेरासमोर
- १०. ७ मार्च - जांबोरी मैदान आणि खडकपाड्याच्या समोर लागलेली आग
- ११. ६ मार्च - मॉडर्न बेकरी, दिवसा लागलेली आग
- १२. ५ मार्च - मॉडर्न  बेकरी, रात्री
- १३. ५ मार्च - युनिट १, ओशिवरा नदी
- १४. ३ मार्च - तापेश्वर मंदिर - मंदिरासमोर
- १५. २ मार्च - खडकपाडासमोर, रात्री
- १६. २५ फेब्रुवारी - बाणगोडा, फिल्टर पाडा, जांबोरी मैदान
- १७. २१ फेब्रुवारी - आरे गेस्ट हाऊस डोंगर.  दुसरी आग - पहिल्यांदा संध्याकाळी मग रात्री.
- १८. १५ फेब्रुवारी - रॉयल पाल्म्स फायर
- १९. ८ फेब्रुवारी - तापेश्वर मंदिराजवळ
- २०. ७ फेब्रुवारी - तापेश्वर मंदिराजवळ
- २१. दिंडोशी हिल

या प्रश्नांची उत्तरे द्या
- गेल्या दोन महिन्यांत एकूण किती आगी लागल्या?
- लागलेल्या आगींचे एकमेकांपासूनचे अंतर किती होते?
- ज्या ठिकाणी आगी लागल्या त्या जमिनीसंदर्भात कोणत्या बिल्डरने प्रस्ताव दिले होते का?
- वन विभाग का चौकशी करत नाही?
 

Web Title: aam aadmi party targets State government on the issue of Aarey forest Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.