Join us

मागाठाणेत सुरू झाला आपला दवाखाना

By मनोहर कुंभेजकर | Published: May 31, 2023 6:03 PM

या दवाखान्यात ४८ मोफत रक्त चाचण्या, विविध आजारांवर उपचार करण्यात येणार आहे.

मनोहर कुंभेजकर, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांच्या संकल्पनेतुन आणि  मागाठाणे विधानसभा क्षेत्राचे आमदार व विभागप्रमुख प्रकाश सुर्वे यांच्या प्रयत्नांनी प्रभाग क्र.५ येथे  जनतेला मोफत उपचार करताना यावा यासाठी 'हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे दवाखाना सुरू करण्यात आला आहे. याचे लोकार्पण त्यांच्या हस्ते करण्यात आले. या दवाखान्यात ४८ मोफत रक्त चाचण्या, विविध आजारांवर उपचार करण्यात येणार आहे.

17 नोव्हेंबर 2022 रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे दवाखान्याचे लोकार्पण करण्यात आले होते.मागाठाणेत सुरू झालेल्या आपल्या दवाखान्यामुळे येथील नागरिकांची वेळेची आणि पैशाची बचत होणार आहे.येथील नागरिकांना आजार आणि सहव्याधी पासून प्रतिबंधात्मक उपचार करण्यासाठी आपला दवाखाना हा उत्तम पर्याय असल्याचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी सांगितले.

यावेळी उपकार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ.प्रमोद अष्टेकर,आर/उत्तर वैद्यकीय अधिकारी डॉ.सुनीला पवार,आर/मध्य वैद्यकीय अधिकारी डॉ.नितेश ठाकूर,सहा.आरोग्य अधिकारी डॉ.सार्थक स्नेही,डॉ.प्रियंका सिंग,महिला विधानसभा संघटक मनीषा सावंत,उपविभागप्रमुख राजेश कासार,शाखाप्रमुख सुनील मांडवे,महिला शाखाप्रमुख विद्या पोतदार,विधानसभा समन्वयक राकेश तिवारी,शांताराम काते,धनंजय यादव आणि पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :बोरिवली