Join us

अँटॉप हिल दुहेरी हत्येप्रकरणी आरोपीला जन्मठेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 09, 2018 5:45 AM

२०११ अँटॉप हिल दुहेरी हत्येप्रकरणी मुंबई सत्र न्यायालयाने २९ वर्षीय विशाल श्रीवास्तव याला मंगळवारी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.

मुंबई : २०११ अँटॉप हिल दुहेरी हत्येप्रकरणी मुंबई सत्र न्यायालयाने २९ वर्षीय विशाल श्रीवास्तव याला मंगळवारी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.सरकारी वकिलांच्या म्हणण्यानुसार, विशाल पीडितांच्या कुटुंबीयांच्या ओळखीचा होता. तो हॉटेल मॅनेजमेंटचा अभ्यास करत होता. पीडितांच्या शेजारीच राहायचा. शेजारच्यांच्या घरातील मौल्यवान वस्तू कुठे ठेवल्या आहेत, याची माहिती विशालला होती, तसेच शेजारचे त्यांच्या वस्तू बँक लॉकरमध्ये ठेवणार असल्याचेही विशालने ऐकले होते. मात्र, ते कुटुंब मौल्यवान वस्तू बँकेत ठेवण्यापूर्वीच विशालने त्या वस्तू चोरण्याचा निर्णय घेतला.३ जून २०११ रोजी विशालने शेजारच्यांच्या घरी प्रवेश केला. ५० वर्षीय महिलेची आणि तिच्या ३ वर्षांच्या नातीची त्याने हत्या केली. त्यानंतर, घरातील सर्व मौल्यवान वस्तू घेऊन फरार झाला. पोलिसांना बराच काळ या हत्येचा सुगावा लागला नाही. त्यानंतर, मुंबई गुन्हे अन्वेषण विभागाने हस्तक्षेप करत तपास सुरू केला. विशालला कानपूरमधून अटक करण्यात आली होती.

टॅग्स :न्यायालयबातम्या