आरे कॉलनी पुन्हा झाली ‘विकास’ क्षेत्र
By admin | Published: April 15, 2016 05:00 AM2016-04-15T05:00:10+5:302016-04-15T05:00:10+5:30
प्रस्तावित विकास नियंत्रण नियमावलीत भविष्यात ‘विकास’ करण्यासाठी राखीव असलेला भूखंड अशी ‘ना विकास क्षेत्रा’ची नवी व्याख्या करण्यात आली आहे़ त्यामुळे आरे वसाहतीसारखे ‘ना विकास
मुंबई : प्रस्तावित विकास नियंत्रण नियमावलीत भविष्यात ‘विकास’ करण्यासाठी राखीव असलेला भूखंड अशी ‘ना विकास क्षेत्रा’ची नवी व्याख्या करण्यात आली आहे़ त्यामुळे आरे वसाहतीसारखे ‘ना विकास क्षेत्र’ विकासासाठी खुले होणार आहे़
२०१४ ते २०३४ या २० वर्षांसाठी मुंबईच्या विकासाचे नियोजन करण्यात येत आहे़ या आराखड्याच्या मसुद्यातून गोरेगाव येथील सर्वात मोठा हरित पट्टा असलेल्या आरे कॉलनीबरोबरच अनेक ‘ना विकास क्षेत्रां’चा विकास प्रस्तावित करण्यात आला होता़ यास पर्यावरणप्रेमी, राजकीय पक्ष अशा सर्वांनीच विरोध केला होता़ अनेक त्रुटींमुळे वादग्रस्त ठरलेल्या विकास आराखड्याचा मसुदा रद्द करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुधारित मसुदा तयार करण्याचे आदेश दिले़ मात्र नव्या आराखड्यातही ‘ना विकास क्षेत्र’ असलेले भूखंड विकासासाठी खुले करण्यात आले आहेत़ त्यामुळे गोरेगाव पूर्व येथील आरे वसाहत, मिठागारांचे भूखंड अशा अनेक मोकळ्या भूखंडांचा विकासाच्या नावाखाली बळी जाण्याची चिन्हे आहेत़ (प्रतिनिधी)