आरेत बंदी, गोखले पूल बंद, विसर्जन कुठे करायचे सांगा? गणेशभक्तांपुढे उभा राहिला पेचप्रसंग
By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2023 01:35 PM2023-09-14T13:35:56+5:302023-09-14T13:36:58+5:30
पर्यावरणाला धोका निर्माण होत असल्याने यंदा आरे कॉलनीच्या तलावात विसर्जनाला मुंबई उच्च न्यायालयाने मनाई केली आहे.
मुंबई :
पर्यावरणाला धोका निर्माण होत असल्याने यंदा आरे कॉलनीच्या तलावात विसर्जनाला मुंबई उच्च न्यायालयाने मनाई केली आहे. तसेच पर्यावरणपूरक पद्धतीने सुरक्षित गणपती विसर्जन करण्यासाठी संपूर्ण मुंबई व उपनगरात ठिकठिकाणी पुरेशा प्रमाणात गणेश विसर्जनाची व्यवस्था करा, असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.
अंधेरी पूर्व व पश्चिमेला जोडणाऱ्या गोखले पुलाचे काम सुरू आहे. त्यामुळे दरवर्षी येथे येणाऱ्या मोठ्या गणेशमूर्तींचे कुठे विसर्जन करणार, असा सवाल गणेश भक्तांनी विचारला आहे. गोखले पुलाचे सध्या काम सुरू आहे. त्यामुळे आरेत पूर्वी येणाऱ्या आणि अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव परिसरातील गणेशमूर्ती जुहू चौपाटी, सात बंगला चौपाटी, वर्सोवा चौपाटी येथे विसर्जनाला कशा घेऊन न्यायच्या असा प्रश्न गणेश भक्तांपुढे आहे. परिणामी, विशेषकरून अनंत चतुर्थीला येथील विसर्जन व्यवस्था कोलमडून पडण्याची शक्यता आहे. दरवर्षी जुहू चौपाटीवर पहाटेपर्यंत, तर वर्सोवा चौपाटीवर दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत विसर्जन सोहळा सुरू असतो.
बिंबिसार मनपा शाळा, आरे कॉलनी मेन रोड, पिकनिक गार्डनजवळ गणेश विसर्जनाची व्यवस्था आहे. तसेच आरेत एक फिरत्या कृत्रिम तलावाची सुविधा करणार आहे. गणेशभक्त त्यांचे छोट्या गणेशमूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावात करू शकतील, तर मोठ्या गणेशमूर्तींचे अन्य ठिकाणी विसर्जन करू शकतील.
- राजेश अक्रे, सहायक आयुक्त, पी. दक्षिण विभाग.
येथे केली आहे व्यवस्था
- यंदा पालिका प्रशासनाने पी. दक्षिण विभागात गोरेगाव पूर्व भागात आठ ठिकाणी आणि पश्चिम भागात सहा ठिकाणी कृत्रिम तलावांची व्यवस्था केली आहे.
- तीन पारंपरिक तलावांमध्ये गोरेगाव पश्चिम येथे बांगूरनगर, महात्मा गांधी मार्ग गणेश घाट तलाव व स्वामी विवेकानंद मार्ग, देवछाया सोसायटी (विहीर) आणि गोरेगाव पूर्वेला पांडुरंगवाडी तलाव, पु. ल. देशपांडे उद्यानाजवळ या तीन ठिकाणी विसर्जनाची व्यवस्था केली आहे.
- गोरेगाव पूर्वेला असलेल्या आठ ठिकाणी कृत्रिम तलावांमध्ये आरे चेक नाका, पश्चिम बाजू क्रमांक १, आरे चेक नाका, पश्चिम बाजू क्रमांक २, आरे भास्कर मैदान, गोकुळधाम.