Join us

आरेत काँग्रेसला धक्का!

By admin | Published: February 06, 2017 3:29 AM

मुंबई कॉँग्रेस अनुसूचित जमाती विभागाचे मुंबई अध्यक्ष आणि आरेच्या विकासासाठी सातत्याने आवाज उठवणारे सुनील कुमरे यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे

मुंबई : मुंबई कॉँग्रेस अनुसूचित जमाती विभागाचे मुंबई अध्यक्ष आणि आरेच्या विकासासाठी सातत्याने आवाज उठवणारे सुनील कुमरे यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. पक्षाच्या अंतर्गत वादामुळे आणि तिकीटवाटपात विश्वासात न घेतल्यामुळे काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले. कुमरे हे आरे कॉलनीतील नावाजलेले अभ्यासू व्यक्ती म्हणून परिचित आहेत. ते काँग्रेसच्या जिल्हा निवडणूक समितीचेदेखील सदस्य आहेत. निवड समिती सदस्यांचे मत विचारात न घेता काँग्रेसने उमेदवार घोषित केले आहेत. ते स्थानिक असलेल्या प्रभाग क्र. ५३ या महिलांसाठी राखीव असलेल्या आणि अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या आणि प्रभाग क्र. ९९ तसेच अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या खारदांडा विभागात अनुसूचित जमातीचे तिकीट दुसऱ्या उमेदवाराला दिले. मात्र आदिवासी विभागाचा अध्यक्ष असूनदेखील विश्वासात न घेतल्यामुळे ते नाराज झाले आहेत. या प्रकरणी सुनील कुमरे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. जो पक्ष आरेचा विकास करेल त्या पक्षात जाण्याच्या विचारात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)