आरे कारशेडचे काम ९५ टक्के पूर्ण; मेट्रो ३ साठी दहा गाड्या दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2024 09:58 AM2024-01-19T09:58:08+5:302024-01-19T09:58:48+5:30

काम वेगाने सुरू.

Aarey carshed work 95 percent complete Work started fast | आरे कारशेडचे काम ९५ टक्के पूर्ण; मेट्रो ३ साठी दहा गाड्या दाखल

आरे कारशेडचे काम ९५ टक्के पूर्ण; मेट्रो ३ साठी दहा गाड्या दाखल

मुंबई : भुयारी मेट्रो मार्ग ३ च्या आरेमधील कारशेडचे काम वेगाने सुरू असून, आतापर्यंत कारशेडचे काम ९५ टक्के पूर्ण झाल्याचा दावा मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने केला आहे. शिवाय या मार्गासाठीच्या दहा मेट्रोदेखील मुंबईत आतापर्यंत दाखल झाल्याचे मुंबई मेट्रो ३ कडून सांगण्यात आले.

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांनी बुधवारी मेट्रोच्या कामाचा आढावा घेतला. आरे कॉलनी येथील कारशेडची पाहणी त्यांनी केली. येथील प्रगतीच्या कामाचा आढावा घेतला. आरे स्टेशन बिल्डिंग, शंटिंग ट्रॅक एरिया, ओसीसी बिल्डिंग, मेनटन्स वर्कशॉपची पाहणी करत त्यांनी कामाचा आढवा घेतला.

पहिला टप्पा- आरे ते बीकेसी

एकूण स्थानके : १०, ९ भुयारी तर १ जमिनीवर
अंतर : १२.४४ किमी

मेट्रो ३ : कुलाबा - वांद्रे - सीप्झ 

नव्या वर्षाच्या सुरुवातीला मेट्रो ३ चा आरे ते बीकेसी स्थानक हा टप्पा पूर्ण होईल, असा दावा मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडून करण्यात आला होता. प्रत्यक्षात मात्र अद्याप याबाबत काहीच हालचाल झालेली नाही. 

आंध्रमध्ये ८ डब्यांच्या मेट्रो :

आंध्र प्रदेशातील श्री सिटीमध्ये मेट्रोच्या कारखान्यात आठ डब्यांच्या मेट्रो तयार केल्या जात आहेत. 

मुंबईत दाखल झाल्यानंतर मेट्रोचे ८ कोच जोडण्याचे काम केले जाते आहे.आतापर्यंत १० मेट्रो आल्या आहेत.

Web Title: Aarey carshed work 95 percent complete Work started fast

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.