‘आरे’वरील संकट टळणार?

By Admin | Published: February 20, 2017 04:27 AM2017-02-20T04:27:58+5:302017-02-20T04:28:18+5:30

मेट्रो रेल्वेच्या कारशेडसाठी आरे कॉलनीची जागा घेण्यास विरोध होत असताना आता पर्यायी जागा शोधण्याचे आदेश मुख्यमंत्री

'Aarey' crisis will run away? | ‘आरे’वरील संकट टळणार?

‘आरे’वरील संकट टळणार?

googlenewsNext

मुंबई : मेट्रो रेल्वेच्या कारशेडसाठी आरे कॉलनीची जागा घेण्यास विरोध होत असताना आता पर्यायी जागा शोधण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनला दिले आहेत. स्वत: मुख्यमंत्र्यांनीच आज पत्रकारांना ही माहिती दिली.
मुख्यमंत्री म्हणाले की, काही लोक या मुद्द्यावर काल मला भेटले होते. आरेचीच जागा संपादित केली पाहिजे अशी सरकारची आडमुठेपणाची भूमिका नाही. उलट अन्य पर्यायांचा मार्ग आम्ही खुला ठेवला आहे. चर्चेमध्ये कलिनाचा पर्याय समोर आला. मेट्रोच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांना मी लगेच तेथील जागेची पाहणी करण्याचे आदेश दिले आहेत. पर्यायी जागा ही सर्व दृष्टीने व्यवहार्य असली पाहिजे एवढेच माझे म्हणणे आहे. तसे होणार नसेल तर मग आरे कॉलनीतील जागेशिवाय पर्याय नसेल, असे मुख्यमंत्री म्हणाले. मुंबई पोर्ट ट्रस्टच्या जागेचा विचार केलेला होता; पण ती जागा व्यवहार्य नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. (विशेष प्रतिनिधी)

बीडीडी पुनर्विकासासाठी अनेक कंपन्यांची तयारी

बीडीडी चाळींच्या पुनर्विकासासाठी कुठलीही कंपनी पुढे आलेली नाही, या वृत्ताचा मुख्यमंत्र्यांनी इन्कार केला. अनेक नामवंत कंपन्या समोर आल्या आहेत. त्यांनी काही अवधी मागितला आहे. म्हाडाच्या माध्यमातून हा पुनर्विकास केला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: 'Aarey' crisis will run away?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.