Aarey Forest: आता झाडे वाचविणेही गुन्हा ठरतोय; अखिलेश यादव यांची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2019 12:21 PM2019-10-06T12:21:36+5:302019-10-06T12:25:42+5:30
आरेतील मेट्रो कारशेडला विरोध करणारी याचिका शुक्रवारी उच्च न्यायालयाने फेटाळली. यानंतर मध्य रात्रीच्या सुमारास काळोखात अख्खे वृक्ष जमिनदोस्त करण्यात आले.
लखनऊ : मुंबईतील आरेजंगलामध्येमेट्रोची कारशेड उभारण्यात येणार आहे. यासाठी हजारो वृक्षांची कत्तल शनिवारी करण्यात आली. याला विरोध करणाऱ्या लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सोशल मिडीयावर वृक्षतोडीवरून टीका होत असताना आता राष्ट्रीय स्तरावरही टीका होऊ लागली आहे.
शिवसेनेच्या नेत्यांनी दुटप्पी भुमिका घेतली आहे. उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि सपाचे नेते अखिलेश यादव यांच्यासह जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी वृक्षतोडीचा निषेध नोंदविला आहे.
आरेतीलमेट्रो कारशेडला विरोध करणारी याचिका शुक्रवारी उच्च न्यायालयाने फेटाळली. यानंतर मध्य रात्रीच्या सुमारास काळोखात अख्खे वृक्ष जमिनदोस्त करण्यात आले. तसेच तेथील विरोध करणाऱ्या आदिवासींनाही मारहाण करण्यात आली. याचा बोभाटा झाल्यावर पर्यावरण प्रेमींनी आरे जंगलाकडे धाव घेतली. यामुळे पोलिसांनी तेथे 144 कलम लागू केले. यानंतर विरोध करणाऱ्या विद्यार्थ्यांसह अनेकांना पोलिसांनी ताब्यात घेत गुन्हे दाखल केले आहेत.
यावर यादव यांनी ट्विट करत नाराजी व्यक्त केली. आज वृक्ष वाचविणे गुन्हा ठरत आहे, उद्या देशद्रोही असल्याचा आरोपही करतील. भाजपाला पर्यावरण वाचविणाऱ्या लोकांपासून धोका वाटत आहे. आंतरराष्ट्रीय मंचावर एकीकडे पर्यावरणाच्या गोष्टी करतात आणि देशात वृक्षतोड करतात. गांधींनी सांगितले होते, की जंगलांसोबतचा मानसाचा व्यवहार त्याची मानसिकता दाखवितो, असे यादव यांनी म्हटले आहे.
तर मेहबूबा मुफ्ती यांनीही आंदोलकांचे समर्थन करताना वृक्षतोडीविरोधात आवाज उठविण्याचे आवाहन केले आहे.
First they came for Socialists & I didn’t speak out because I wasn’t a Socialist.
— Mehbooba Mufti (@MehboobaMufti) October 5, 2019
They came for TradeUnionists & I didn’t speak out because I wasn’t one
Then they came for Jews & I didn’t speak out because I wasn’t a Jew.
Then they came for me & no one was left to speak for me https://t.co/qlhzEEj9jq
500 झाडे रातोरात तोडली
भुयारी मेट्रो-तीनच्या कारशेडसाठी आरे कॉलनीत वृक्षतोड सुरू झाली असून, त्यास विरोध करणाऱ्या पर्यावरणप्रेमींना रोखण्यासाठी पोलिसांना नाकाबंदी करावी लागली. शनिवारी सकाळी जमावबंदीचे आदेश लागू करून, पोलिसांनी राष्ट्रवादीचे आ. जितेंद्र आव्हाड व शिवसेनेच्या प्रियांका चतुर्वेदी, तसेच आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले. अटक केलेल्या २९ जणांना नंतर सोडण्यात आले.
उच्च न्यायालयाने वृक्षतोडीला विरोध करणाºया याचिका शुक्रवारी फेटाळताच प्रशासनाने सुमारे ५00 झाडे पाडली. शनिवारी तिथे जाणारे रस्ते बंद केले. वृक्षतोड सुरू असलेल्या ठिकाणी जाण्यास मज्जाव केला. वृक्षतोडीचे फोटो काढले जाऊ नयेत, म्हणून आंदोलकांचे मोबाइलही ताब्यात घेतले. वृक्षतोडीविरोधात आंदोलकांनी केलेला अर्ज उच्च न्यायालयाच्या सुट्टीकालीन खंडपीठाने शनिवारी फेटाळला.
आरेतील स्थानिकांच्याही गाड्यांची तपासणी व चौकशी होत होती. प्रसारमाध्यमांनाही प्रवेशबंदी होती.