Aarey Forest : 'उद्धव ठाकरेंचे नाव बदलून यू- टर्न ठाकरे ठेवायला हवे'

By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2019 10:09 PM2019-10-05T22:09:39+5:302019-10-05T22:48:29+5:30

आरेमधील प्रस्तावित मेट्रो कारशेडविरोधात पर्यावरणप्रेमींनी दाखल केलेल्या याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावल्यानंतर आरेमधील वृक्षतोडीस सुरुवात करण्यात आली होती.

Aarey Forest : 'Uddhav Thackeray's name should be changed to U-turn Thackeray' | Aarey Forest : 'उद्धव ठाकरेंचे नाव बदलून यू- टर्न ठाकरे ठेवायला हवे'

Aarey Forest : 'उद्धव ठाकरेंचे नाव बदलून यू- टर्न ठाकरे ठेवायला हवे'

Next

मुंबई: आरेमधील प्रस्तावित मेट्रो कारशेडविरोधात पर्यावरणप्रेमींनी दाखल केलेल्या याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावल्यानंतर आरेमधील वृक्षतोडीस सुरुवात करण्यात आली होती. त्यामुळे अनेक दिवसांपासून चर्चेत नसलेला आरेतील वृक्षतोडीचा मुद्दा पर्यावरणप्रेमींसह विरोधकांनी देखील उचलून धरत त्यास विरोध केला. तसेच 'आरे' ला 'का' रे करण्याची भूमिका घेणाऱ्या शिवसेनेने वृक्षतोडीबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्यावरुन विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी टोला लगावला आहे.  
 
धनंजय मुंडें ट्विट करत म्हणाले की, आरेच्या मुद्यावर शिवसेनाप्रमुखउद्धव ठाकरे म्हणतात झाडं तोडणाऱ्यांचे काय करायचे ते नव्याने सरकार आल्यानंतर ठरवू. खरंतर उद्धव ठाकरे यांचे नाव बदलून 'यू- टर्न' ठाकरे ठेवायला हवे, कारण सत्तेपुढे लाचार होत सगळ्याच मुद्यावर ते यू- टर्न घेत असतात असं म्हणत उद्धव ठाकरेंच्या भूमिकेवर निशाणा साधला आहे.

आरेतील प्रस्तावित मेट्रो कारशेडसाठी सुरू झालेल्या वृक्षतोडीवर आज पत्रकार परिषदेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर या विषयाचा अभ्यास करुन माहिती घेऊन योग्य वेळी बोलू, असं उत्तर ठाकरे यांनी दिलं. आरेचा विषय सोडणार नाही. झाडं तोडणाऱ्यांचं काय करायचं ते लवकरच ठरवण्यात येईल. तसेच या मुद्यासाठी वेगळी पत्रकार परिषद घेऊन रोखठोक बोलू, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी आरेचा प्रश्न टाळण्याचा प्रयत्न केला होता.

Web Title: Aarey Forest : 'Uddhav Thackeray's name should be changed to U-turn Thackeray'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.