Join us

आरे मेट्रो उद्या १४ तास बंद राहणार, दोन्ही मार्गांवर मेगाब्लॉक 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 07, 2023 5:44 AM

या प्रकल्पाची संपूर्ण स्थापत्य तसेच अन्य तांत्रिक प्रणालीची कामे पूर्ण झाली आहेत.

मुंबई :  आरेतील मेट्रो मार्ग २ अ आणि ७ पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यासाठी रविवारी, ८ जानेवारीला सकाळी ६ पासून रात्री १० पर्यंत दोन्ही मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.  या काळात डहाणूकरवाडी ते आरेदरम्यान पहिल्या टप्प्यात सुरू असलेली मेट्रो सेवा रविवारी १४ तास बंद असेल. 

त्याच्या फेज १ आणि २ या दोन्ही मार्गिकांमध्ये एकात्मिक सिग्नलिंग प्रणाली कार्यान्वित करणे गरजेचे आहे. या प्रणालीची अंमलबजावणी आणि चाचणी करण्यासाठी सध्या कार्यान्वित असलेली पहिल्या टप्प्यांतील सेवा बंद करून ही कामे केली जाणार आहेत. 

या प्रकल्पाची संपूर्ण स्थापत्य तसेच अन्य तांत्रिक प्रणालीची कामे पूर्ण झाली आहेत. लवकरच मेट्रो २ अ आणि ७ चा दुसरा टप्पाही मुंबईकरांच्या सेवेत दाखल होईल. ही मार्गिका पादचारी पुलाद्वारे मेट्रो मार्ग १ सोबत जोडली गेल्यामुळे रस्त्यावरील रहदारी कमी होईल, अशी माहिती एमएमआरडीएचे महानगर आयुक्त एस. व्ही. आर. श्रीनिवास यांनी दिली.

त्यासाठी अनाऊन्समेंट सिस्टीम, पॅसेंजर इन्फॉर्मेशन डिस्प्ले सिस्टीम, सिग्नलिंग आणि टेलिकॉम सिस्टीमची चाचणी मेगाब्लॉकच्या काळात केली जाणार आहेत. 

टॅग्स :मेट्रोमुंबई