मुंबई : आरेमध्ये अल्पवयीन मुलांवरील अत्याचार आणि आत्महत्याप्रकरणी अद्याप पवई पोलिसांच्या हाती ठोस पुरावा लागलेला नाही. त्यातच मयत मुलांच्या ज्या मित्राला चौकशीसाठी उत्तर प्रदेशहून आणण्यात आले होते, त्याच्याकडूनही पोलिसांच्या पदरी निराशाच हाती लागली आहे.अत्याचारानंतर आत्महत्या करणाºया अल्पवयीन मुलांसोबत असलेल्या जवळपास शंभरएक मुलांची चौकशी पोलिसांनी केली. या दोघांसोबत त्यांच्याच वयाचा एक मित्र नेहमी असायचा अशी माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार उत्तर प्रदेशहून पवई पोलिसांनी शुभम् नावाच्या त्यांच्या एका मित्राला मुंबईत आणले. त्याला विश्वासात घेऊन पोलिसांनी त्याची चौकशी केली. ज्यात तुमच्यासोबत कोणी अनैसर्गिक पद्धतीने वागत होते का? अशा आशयाचे प्रश्न त्याला विचारण्यात आले. मात्र त्याला याबाबत काहीच माहीत नसल्याचे उत्तर त्याने पोलिसांना दिल्याने तपास अधिकाºयांच्या पदरी निराशा पडली.शाळेत मस्ती करायचो, तेव्हामुलं चिमटे काढायची. मात्र असा काही प्रकार कधी घडला नाही, असेही त्याने पोलिसांना सांगितल्याचे समजते. गुन्हे शाखादेखील या प्रकरणी समांतर तपास करत आहे. ज्यातत्यांनी केईएम रुग्णालयात मृत्यू झालेल्या सुनीलचा (नावात बदल) मोठा भाऊ, शुभम् आणि अजून एका मित्राची चौकशी केल्याचे सूत्रांनी सांगितले. सुनीलचे कुटुंबीय सध्या उत्तर प्रदेशला मुलाचे अंत्यविधी पार पाडण्यासाठी गेले आहेत. तेपरत येईपर्यंत जर आरोपीला पोलीस पकडू शकले नाहीत, तर पवईपोलीस ठाण्याला स्थानिक पुन्हाघेराव घालतील, असा इशारा त्यांनी दिला आहे.१२ जुलै रोजी दोन अल्पवयीन मुलांवर बलात्कार झाल्याने त्यांनी विष प्राशन केले. ज्यात त्यांचा मृत्यू झाला. आरे परिसरात हा प्रकार घडल्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली होती. या प्रकरणी पोलीस अधिक चौकशी करीत आहेत.
आरे अल्पवयीन अत्याचार: मित्राच्या चौकशीत पोलिसांच्या पदरी निराशा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2017 3:14 AM