Join us

आरे वाचवायचे आहे; नाही तर मुंबई बुडेल, पर्यावरणवाद्यांचे मत

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2020 2:57 AM

मुख्यमंत्र्यांनी आम्हाला आरे वाचवण्याचे आश्वासन दिले होते. लोकांना आरे वाचविण्यात रस आहे. कारण विकासाच्या नावाखाली येथील हिरवळ नाश पावत आहे.

मुंबई - मंत्रालयात शुक्रवारी झालेल्या बैठकीत आरे येथील मेट्रो-३चे कारशेड दुसरीकडे हलविण्याबाबत चर्चा झाली असेल तर आम्ही तिचे स्वागत करतो. कारण विकास जेवढा महत्त्वाचा आहे तेवढेच पर्यावरणही महत्त्वाचे आहे. कारण पर्यावरणाचा विनाश करून तुम्ही विकास करू शकत नाही.परिणामी आम्हाला मुंबई, आरे महत्त्वाचे असून, येथील विकास करताना पर्यावरणाची हानी होऊ नये, असे आमचे म्हणणे आहे. कारण असे झाल्यास मुंबई बुडण्यास वेळ लागणार नाही, असे म्हणणे आरे येथील पर्यावरणवाद्यांनी मांडले.मुंबईतल्या तिवरांच्या संरक्षणासाठी काम करत असलेल्या मिली शेट्टी यांच्याशी ‘लोकमत’ने संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, मुख्यमंत्र्यांनी आम्हाला आरे वाचवण्याचे आश्वासन दिले होते. लोकांना आरे वाचविण्यात रस आहे. कारण विकासाच्या नावाखाली येथील हिरवळ नाश पावत आहे.गोरेगाव पूर्वेकडील जमीन कारशेडसाठी वापरण्याबाबत सरकार विचार करत असेल तर साहजिकच स्वागत आहे. दुसरीकडे आरेमध्ये असलेला हरित पट्टा रहिवासी क्षेत्रात रूपांतरित करण्यात येऊ नये, असे म्हणत येथे मेट्रो भवन काय, कोणतेच बांधकाम करण्यात येऊ नये.मेट्रो भवनासाठी नाही तर कोणत्याच बांधकामासाठी आरेतील ०.१ हेक्टर जागाही घेऊ नये, असा सूर आरे येथील पर्यावरणवादी कार्यकर्त्यांनी लगावला आहे.आरेमध्ये मेट्रो भवन बांधण्यासाठीच्या जागेच्या हरित पट्ट्याचे रहिवासी पट्ट्यात रूपांतरण करण्यासाठी घेण्यात येत असलेल्या जनसुनावणीत आरे येथील पर्यावरण कार्यकर्त्यांनी यापूर्वी आपले म्हणणे मांडले आहे. मेट्रो भवनासाठी पर्यायी जागांचा वापर करण्यात यावा, असाही सूर त्यांनी लावला आहे.या परिसरात कोणतेच बांधकाम नकोगोरेगाव पूर्वेकडील जमीन कारशेडसाठी वापरण्याबाबत सरकार विचार करत असेल तर साहजिकच स्वागत आहे. दुसरीकडे आरेमध्ये असलेला हरित पट्टा रहिवासी क्षेत्रात रूपांतरित करण्यात येऊ नये, असे म्हणत येथे मेट्रो भवन काय, कोणतेच बांधकाम करण्यात येऊ नये़ असे पर्यावरणवाद्यांचे मत आहे़

टॅग्स :आरेपर्यावरण