Join us

आरेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 4:07 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : घराच्या दुरुस्तीसाठी अर्जदाराकडे ५० हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी आरेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (गोरेगाव दुग्ध ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : घराच्या दुरुस्तीसाठी अर्जदाराकडे ५० हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी आरेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (गोरेगाव दुग्ध वसाहत तथा उपायुक्त प्रशासन, अतिरिक्त कार्यभार, वरळी दुग्ध डेअरी) नथू विठ्ठल राठोड (४२) आणि शिपाई अरविंद त्रिभुवन तिवारी (५७) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी एसीबी अधिक तपास करत आहे.

एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांनी घर दुरुस्तीसाठी आरेचे राठोड यांच्याकडे अर्ज केला. तेव्हा राठोड यांनी त्यांना तिवारी यास भेटण्यास सांगितले. तिवारीने त्यांच्याकडे ५० हजार रुपयांची लाच मागितली. पैसे द्यायचे नसल्याने तक्रारदार यांनी एसीबीकडे धाव घेतली. अशात दोघांनी लाचेची मागणी केल्याचे स्पष्ट होताच सोमवारी एसीबीने सापळा रचला. तेव्हा तिवारीला रंगेहाथ पकडण्यात आले आहे. सोमवारी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करत एसीबी अधिक तपास करत आहे.

....