Join us

अबब... तब्बल साडेतीन कोटींची वीजचोरी!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2023 6:35 AM

या प्रकरणांमध्ये मोठ्या प्रमाणात घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांचा समावेश आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यात साडेतीन कोटींची ३८३ वीजचोरीची प्रकरणे महावितरणच्या सुरक्षा व अंमलबजावणी विभागाने तीन दिवस राबविलेल्या विशेष तपासणी मोहिमेत उघडकीस आणली आहेत.कोकण, पुणे, नागपूर व छत्रपती संभाजीनगर या चारही परिक्षेत्रांमध्ये २४ ते २६ एप्रिलदरम्यान मोहीम राबविण्यात आली. मोहिमेदरम्यान ३८३ वीजचोरीची प्रकरणे उघडकीस आणण्यात आलेली आहेत. नागपूर परिक्षेत्रांतर्गत सर्वाधिक १२१,  कोकण परिक्षेत्रात ११७, औरंगाबाद परिक्षेत्रात ९२ तसेच पुणे परिक्षेत्रांतर्गत वीजचोरीची ५३ प्रकरणे उघडकीस आलेली आहेत.

या प्रकरणांमध्ये मोठ्या प्रमाणात घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांचा समावेश आहे. या वीजचोरीप्रकरणी ३ कोटी ५० लाख रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. भविष्यात अशा प्रकारच्या विशेष तपासणी मोहिमा राबविण्यात येणार आहेत. त्यामुळे ग्राहकांनी वीजचोरी न करता विजेचा अधिकृत वापर करून सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.

टॅग्स :मुंबईगुन्हेगारी