Join us

पोटविकार शल्यचिकित्सक डॉ. श्रीखंडे यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2024 11:22 AM

त्यांचे मराठीमध्ये ‘आणि दोन हात’  हे पुस्तक  खूप गाजले.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई :  पोटविकार शल्यचिकित्सक डॉ. विनायक नागेश श्रीखंडे यांचे वृद्धापकाळाने शुक्रवारी सकाळी दादर हिंदू कॉलनी येथील राहत्या घरी निधन झाले. ते ९३ वर्षाचे होते. त्यांच्यावर शनिवारी सकाळी सायन येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या या निधनाने वैद्यकीय वर्तुळात हळहळ व्यक्त केली जात आहे.   

डॉ. श्रीखंडे पोटविकार शस्त्रक्रियेतील मोठे नाव असून अनेक विद्यार्थी त्यांनी घडविले आहेत. ते अनेक वर्ष बॉम्बे रुग्णालयात आणि हिंदू कॉलनी येथील त्यांच्या नर्सिंग होममध्ये  रुग्णांना सेवा देत होते. त्यांचे शिक्षण ग्रांट मेडिकल वैद्यकीय महाविद्यालयातून झाले होते. त्यांच्या पश्चात मुलगा डॉ. शैलेश, मुली डॉ. अंजना, सीमा आणि वासंती, जावई डॉ. आनंद नांदे आणि धनंजय खोत असा परिवार आहे.

डॉ. श्रीखंडे इंटरनॅशनल हिपेटो पॅनक्रियाटो बिलरी असोसिएशन या संस्थेच्या भारतातील शाखेचे पहिले अध्यक्ष होते. ११९४ साली त्यांनी देशाचे राष्ट्रपती डॉ. शंकरदयाल शर्मा यांच्यावर शस्त्रक्रिया केली होती. त्यांचे मराठीमध्ये ‘आणि दोन हात’  हे पुस्तक  खूप गाजले असून साहित्य क्षेत्रातील त्यांना अनेक पुरस्कारही मिळाले आहेत.  त्यांनतर  ‘रिफ्लेक्शन ऑफ सर्जन’ या नावाने त्या पुस्तकाचे इंग्रजीमध्ये भाषांतर करण्यात आले होते.  

 

टॅग्स :डॉक्टरडॉक्टर