Join us  

अब्दुल मल्लिक, शोएब खानच्या हँडलरच्या शोधात एटीएस

By admin | Published: October 24, 2015 3:14 AM

तीन पोलिसांवर चाकुने हल्ला करणारा अब्दुल मल्लिक आणि ‘अल काईदा’चे प्रशिक्षण घेण्यासाठी अफगाणिस्तानला जाऊ पाहताना अटक झालेला अहमद खान या दोघांना दहशतवादी

- डिप्पी वांकाणी, मुंबईतीन पोलिसांवर चाकुने हल्ला करणारा अब्दुल मल्लिक आणि ‘अल काईदा’चे प्रशिक्षण घेण्यासाठी अफगाणिस्तानला जाऊ पाहताना अटक झालेला अहमद खान या दोघांना दहशतवादी विचारांनी भारणारी व्यक्ती एकच असावी, असा संशय आहे. या व्यक्तीचा शोध घेण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस)शोएब आणि मल्लिकला समोरासमोर बसवून चौकशी करण्याचे ठरविले आहे.मूलतत्ववादी विचारांच्या प्रभावाखाली आलेल्या अब्दुल मल्लिकने (रा. पुसद, जि. यवतमाळ) पुसदमध्ये गेल्या बकरी ईदच्या दिवशी गोमांस बंदीची अमलबजावणी करणाऱ्या तीन पोलीस कर्मचाऱ्यांवर मशिदीच्या बाहेर चाकू हल्ला केला होता. त्यानंतर मल्लिकवर बेकायदा कारवाया प्रतिबंधक कायद्याखाली (युएपीए) गुन्हा नोंदविण्यात आला. तर अल काईदाकडून प्रशिक्षण घेण्यासाठी गेल्यावर्षी अफगाणिस्तानात जाण्याच्या बेतात असताना हैदराबाद पोलिसांनी शोएबला ताब्यात घेतले होते. एटीएसमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या दोघांना कोणा एकाच व्यक्तीने सांभाळले का, याचा शोध सुरु आहे. शोएबला अटक केली असून त्याला २ नोव्हेंबरपर्यंत आमची कोठडी देण्यात आली आहे, असे एटीएसचे महासंचालक निकेत कौशिक यांनी सांगितले.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मल्लिकने दंडाधिकाऱ्यांपुढे दिलेल्या निवेदनात शोएब व मी एकेकटे हल्लेखोर कसे बनत आहोत याची चर्चा करायचो आणि भारतविरोधातील कारवायांसाठी ‘अल कायदा’चे प्रशिक्षण कसे घेत आहोत याची माहिती दिली. ‘‘शोएबला अटक झाल्यापासून आणखी किती जण त्यात सहभागी आहेत हे आम्हाला शोधायचे आहे. आधी आम्ही त्यांचे म्हणणे स्वतंत्रपणे नोंदवून घेऊन त्यानंतर त्यांना एकमेकांसमोर आणले जाईल,’’ असे सूत्र म्हणाले. अब्दुल मल्लिक व शोएब अहमद खान हे दोघे वारंवार भेटून राज्य सरकारच्याविरोधात काय करता येईल आणि एकेकट्याने हल्ले केले पाहिजेत याची चर्चा करीत होते. स्टुडंटस् इस्लामिक मुव्हमेंट आॅफ इंडियाच्या (सिमी) इलेक्ट्रॉनिक आणि सोशल मिडियाच्या माध्यमातून लढणाऱ्या शाखेशीही हे दोघे संबंधित असावेत.