Join us

अबब..! बाप्पांसाठी २६५ कोटींचे विमा कवच

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2018 1:45 AM

जीएसबी मंडळाचे पाऊल; मूर्तीवर ७० किलो सोने

मुंबई : गणेशोत्सव काळात सार्वजनिक मंडळांच्या गणरायाचे दर्शन घेण्यासाठी भक्तांची गर्दी उसळते. या गर्दीत अनुचित प्रकार घडून आर्थिक नुकसान होऊ नये यासाठी मंडळे विम्याचा आधार घेत आहेत. असाच तब्बल २६४.७५ कोटी रुपयांचा विमा गौड सारस्वत ब्राह्मण गणेश मंडळाने (जीएसबी) काढला आहे.जीएसबी हे मुंबईतील सर्वांत श्रीमंत गणेश मंडळ मानले जाते. या मंडळाची गणेशमूर्ती ७० किलो सोने व ३५० किलो चांदीने सुशोभित करण्यात आली आहे. हे मंडळ ६४ वर्षे जुने आहे. मंडळाच्या परिसरात ६५ सीसीटीव्ही कॅमेरे लावले असून ते थेट पोलीस नियंत्रण कक्षाशी जोडण्यात आले आहेत. त्याखेरीज परिसरात ५०० सुरक्षारक्षक तैनात आहेत. ड्रोन कॅमेरांचीही संपूर्ण परिसरावर नजर असेल. पण त्यानंतरही नुकसान होऊ नये यासाठी २६४.७५ कोटींचा विमा काढल्याचे मंडळाचे म्हणणे आहे.८५० कोटींची उलाढालया विम्याचा प्रिमियम साधारण प्रति १ कोटीमागे २.५० लाख रुपये असतो. एकट्या मुंबईतील अशाप्रकारच्या विमा क्षेत्रात गणेशोत्सव काळात ८५० कोटी रुपयांहून अधिक उलाढाल होते, असे कंपन्यांचे म्हणणे आहे.

टॅग्स :गणेशोत्सव