Join us

LMOTY 2024: ‘पूनावाला फिनकॉर्प’चे अभय भुतडा यांचा ‘लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर’ पुरस्काराने सन्मान

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2024 9:15 PM

LMOTY 2024: 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' हा पुरस्कार सोहळा मुंबईत गेट वे ऑफ इंडिया येथे पार पडला.

Lokmat Maharashtrian of the Year Awards 2024: महाराष्ट्राच्या जडणघडणीत आपल्या कार्यानं मोलाचा हातभार लावणाऱ्या सोन्यासारख्या माणसांचा सन्मान करणारा 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' हा पुरस्कार सोहळा गुरुवारी मुंबईत गेट वे ऑफ इंडिया येथे पार पडला.

प्रशासन, राजकारण, वैद्यकीय, उद्योग, क्रीडा, कृषी, सीएसआर, लोकसेवा-समाजसेवा, शिक्षण या क्षेत्रांमध्ये लक्षवेधी योगदान देणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना दरवर्षी 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्काराने गौरवण्यात येते. या पुरस्कार सोहळ्यात पूनावाला फिनकॉर्प लिमिटेडचे अभय भुतडा यांचा विशेष पुरस्काराने सन्मान करण्यात आला.

अभय भुतडा हे पूनावाला फिनकॉर्प लिमिटेडचे एक कुशल नेतृत्व आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत. ते चार्टर्ड अकाउंटंट आहे. पूनावाला समूहासाठी कर्ज देण्याचा व्यवसाय सुरू करण्यात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. वित्तीय सेवा वाढविण्यासाठी तंत्रज्ञानाचा लाभ घेण्याच्या त्यांच्या दूरदृष्टीमुळे त्यांनी कंपन्यांना मोठ्या यशोशिखरावर नेले आहे. 

सन २०१९ मध्ये अभय हे पूनावाला फायनान्स प्रायव्हेट लिमिटेडचे सहसंस्थापक आहेत. तसेच ते कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ म्हणूनही पुढे आता कार्यरत आहेत. या कंपनीच्या माध्यमातून कर्ज देण्याबाबत डिजिटल-केंद्रित दृष्टीकोन त्यांनी विकसित केला. त्यांच्या नेतृत्वाखाली कंपनीने पहिल्याच वर्षात नफा नोंदवला. तसेच केअर रेटिंग्स लिमिटेडकडून "AA+" चे क्रेडिट रेटिंग प्राप्त केले. 

अभय हे CII, ASSOCHAM, FICCI आणि FIDC यांसारख्या प्रसिद्ध उद्योग मंचांचे सदस्य म्हणून सक्रियपणे सहभागी आहे. आरोग्यसेवा आणि शिक्षणामध्ये कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीमध्येही त्यांनी योगदान दिले आहे. उद्योगातील योगदानासाठी अभय भुतडा यांना "यंग एंटरप्रेन्योर ऑफ इंडिया २०१७", "प्रॉमिसिंग एंटरप्रेन्योर ऑफ इंडिया २०१९," आणि "२०२०-२१ साठी ४० अंतर्गत ४० कॅटेगरीत सर्वात प्रभावशाली नेते" असे अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

टॅग्स :लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर 2024लोकमत इव्हेंटलोकमत