अश्विनी बिद्रे खून प्रकरण: बडतर्फ पोलिस निरीक्षक अभय कुरंदकर दोषी, राजू पाटील निर्दोष
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2025 14:39 IST2025-04-05T14:35:28+5:302025-04-05T14:39:01+5:30
पनवेल/ कोल्हापूर : सहायक पोलिस निरीक्षक अश्विनी बिद्रे-गोरे खून प्रकरणात बडतर्फ पोलिस निरीक्षक अभय कुरुंदकर हाच मुख्य आरोपी असल्याचे ...

अश्विनी बिद्रे खून प्रकरण: बडतर्फ पोलिस निरीक्षक अभय कुरंदकर दोषी, राजू पाटील निर्दोष
पनवेल/कोल्हापूर: सहायक पोलिस निरीक्षक अश्विनी बिद्रे-गोरे खून प्रकरणात बडतर्फ पोलिस निरीक्षक अभय कुरुंदकर हाच मुख्य आरोपी असल्याचे निष्पन्न झाले. तर आरोपी राजू पाटील यांची पुराव्या अभावी निर्दोष सुटका झाली. आज, शनिवारी (दि. ५) पनवेल येथील सत्र न्यायालयाने हा निकाल दिला. ११ एप्रिल रोजी शिक्षेची सुनावणी होणार आहे. न्यायालयाच्या आजच्या निकालाकडे पोलिस वर्तुळाचे लक्ष लागून राहिले होते.
अभय कुरुंदकरवर अनेक आरोप असताना राष्ट्रपती पुरस्कारासाठी शिफारस केली जाते हे भयंकर असून राष्ट्रपती पदक शिफारस करणाऱ्या कमिटीवर न्यायाधीश संतापले. याप्रकरणात महेश प्रनोकार व कुंदन भंडारी यांचा मृतदेहची विल्हेवात लावण्यासाठी सहभागी असल्याचे सिद्ध झाले. मयत अश्विनी बिद्रे-गोरे यांचे पती आनंद गोरे सुनावणीवेळी कोर्टात हजर होते.
खून करुन वसईच्या खाडीत फेकला होता मृतदेह
अश्विनी बिद्रे-गोरे या सहायक पोलिस निरीक्षकपदावर कार्यरत हात्या. हातकणंगले तालुक्यातील आळते हे त्यांचे मूळचे गाव. सामान्य घराण्यातून वरिष्ठ पदावर पोहचलेल्या अधिकारी अशी त्यांची ओळख. अश्विनी बिद्रे-गोरे यांचा ११ एप्रिल २०१६ रोजी खून झाला. खून खटल्यात मुख्य संशयित व बडतर्फ वरिष्ठ पोलिस निरीक्षक अभय कुरुंदकर याने त्याच्या मीरा रोड येथील घरी अश्विनी बिद्रे-गोरे यांचा अमानुष खून केल्याचा तसेच सहकाऱ्याच्या मदतीने मृतदेहाचे लहान-लहान तुकडे करून वसईच्या खाडीत फेकून दिल्याचा आरोप होता.
२०१७ ला अभय कुरुंदकरला अटक
या प्रकरणी ७ डिसेंबर २०१७ रोजी वरिष्ठ पोलिस निरीक्षकपदावर ठाणे जिल्ह्यात कार्यरत असलेल्या अभय कुरुंदकरला या प्रकरणात अटक झाली. तर त्याचा साथीदार राजेश पाटील याला दि. १० डिसेंबर २०१७ रोजी जेरबंद केले होते. त्यांच्या चौकशीनंतर पोलिसांनी कुंदन भंडारी व महेश फळणीकरला अटक केली होती