मुंबई : म्हाडाच्या वसाहतींना सेवा शुल्क संदर्भात अभय योजना लागू करण्याबाबत सकारात्मक पावले उचलण्यात आल्याची माहिती लोकप्रतिनिधींनी दिली. शासनाकडून या संदर्भातले एक पत्र म्हाडाला पाठविण्यात आले असून, यात अभय योजनेस मान्यता देण्यात आल्याचे म्हटले आहे.
म्हाडाच्या थकीत सेवा शुल्काच्या १८ % व्याजदर रद्द करण्याचा महाविकास आघाडीचा निर्णय घेण्यात आला असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हाडा वसाहतींना सन १९९८ पासूनचे थकीत सेवा शुल्का वरील १८ % व्याजदर व दंड माफ करून मुद्दल रक्कमेला भरण्यासाठी अभय योजना लागू करावी, असे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने अभय योजना जाहीर झाली आहे. सुधारित रक्कम मागण्यांसह व्याज माफ करण्याबाबत आणि पाच वर्षात समान दहा हप्त्यांमध्ये रक्कम भरण्याबाबत सूट देण्यात यावी. जे गाळेधारक ही रक्कम एक रकमी भरण्यास तयार आहेत त्यांना व्याजा बाबत सूट देण्यात यावी, असा उल्लेख सदर पत्रात नमूद करण्यात आला असून ही योजना फक्त मुंबई शहर आणि उपनगरातील म्हाडा वसाहतींसाठी आहे.