अभिजीत पानसे चिडले, रागातच थिएटरबाहेर पडले; 'ठाकरे'च्या स्क्रीनिंगला वेगळाच 'सीन'

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2019 11:46 PM2019-01-23T23:46:58+5:302019-01-24T00:42:13+5:30

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित 'ठाकरे' हा चित्रपट येत्या 25 जानेवारीला प्रदर्शित होत आहे.

Abhijit Panse angry, went out of the theater; 'Thackeray' movie screening issue | अभिजीत पानसे चिडले, रागातच थिएटरबाहेर पडले; 'ठाकरे'च्या स्क्रीनिंगला वेगळाच 'सीन'

अभिजीत पानसे चिडले, रागातच थिएटरबाहेर पडले; 'ठाकरे'च्या स्क्रीनिंगला वेगळाच 'सीन'

googlenewsNext
ठळक मुद्देहिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित 'ठाकरे' हा चित्रपट येत्या 25 जानेवारीला प्रदर्शित होत आहे. वडाळ्यातल्या कार्निव्हल आयमॅक्समध्ये सुरू असलेल्या या स्क्रीनिंगला मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्यानं सिनेमागृह फुल्ल झालं. पानसेंसह कुटुंबीयांना स्क्रीनिंगला बसण्यासाठी जागा आरक्षित करण्यात आलेली नव्हती.

मुंबई- हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित 'ठाकरे' हा चित्रपट येत्या 25 जानेवारीला प्रदर्शित होत आहे. तत्पूर्वी 'ठाकरे' चित्रपटाची स्क्रीनिंग ठेवण्यात आली होती. वडाळ्यातल्या कार्निव्हल आयमॅक्समध्ये सुरू असलेल्या या स्क्रीनिंगला मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्यानं सिनेमागृह फुल्ल झालं. अशातच चित्रपटाचे दिग्दर्शक असलेले अभिजित पानसेंसह कुटुंबीयांना स्क्रीनिंगला बसण्यासाठी पुढच्या रांगेत जागा आरक्षित करण्यात आली होती. परंतु एखाद्या चित्रपटाच्या दिग्दर्शकाला मागच्या बाजूला जागा आरक्षित ठेवण्यात येते.

सिनेमागृहात बसण्यासाठी मागच्या बाजूला जागा न मिळाल्यानं अभिजित पानसे प्रचंड संतापले. त्यानंतर चित्रपटाचे निर्माते आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. परंतु संजय राऊतांचं ऐकून न घेता 'ठाकरे'च्या स्क्रीनिंगमधून अभिजीत पानसे कुटुंबीयांसह तडकाफडकी निघाले. त्यामुळे स्क्रीनिंगला उपस्थित असलेल्या अनेकांच्या भुवया उंचावल्या.

25 जानेवारीला ठाकरे' चित्रपट प्रदर्शित होणार आहे. शिवसेनेचे खासदार आणि सामनाचे संपादक संजय राऊत यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर अभिजीत पानसेंनी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. या चित्रपटात बाळासाहेबांची भूमिका नवाजुद्दीन सिद्दीकी यांनी साकारली असून, मीनाताई ठाकरेंच्या भूमिकेत अमृता राव दिसणार आहे.


कोण आहेत अभिजित पानसे?
अभिजित पानसे हे प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक आहेत. 2014मध्ये त्यांनी दिग्दर्शित केलेल्या रेगे या मराठी चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. रेगे हा चित्रपट प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतरला होता. रेगे हीट होण्यामागे अभिजित पानसे यांची प्रचंड मेहनत होती. ठाकरे सिनेमाच्या दिग्दर्शनासाठी संजय राऊत यांनी अभिजित पानसे यांची निवड केली. विशेष म्हणजे अभिजित पानसे चित्रपटसृष्टीबरोबरच राजकारणातही सक्रिय आहेत. राज ठाकरेंच्या जवळचे नेते म्हणून पानसेंची ओळख आहे. शिवसेनेत असलेल्या अभिजित पानसेंनी गेल्या काही दिवसांपूर्वीच मनसेत प्रवेश केला होता. त्यांनी 2014ची लोकसभा निवडणूकही लढवली होती.
 

Web Title: Abhijit Panse angry, went out of the theater; 'Thackeray' movie screening issue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.