Join us

अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग

By गौरी टेंबकर | Published: February 09, 2024 9:54 AM

Abhishek Ghosalkar Murder Case: या खळबळजनक प्रकरणाचा तपास हा गुन्हे शाखेला वर्ग करण्यात आल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने लोकमत ला सांगितले. त्यानुसार गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी तपास करायला सुरुवात केली आहे.

- गौरी टेंबकरमुंबई -ठाकरे गटाचे नेते विनोद घोसाळकर यांचे पुत्र आणि माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गुरुवारी संध्याकाळी एका फेसबुक लाईव्ह दरम्यान गोळी झाडून हत्या करण्यात आली. तसेच त्यांच्यावर गोळीबार केल्याचा आरोप असलेला सामाजिक कार्यकर्ता मॉरिस नारोन्हा ऊर्फ मॉरिस भाई यानेही   स्वतःवर गोळी झाडत आत्महत्या केल्याचा संशय आहे. ही घटना बोरिवली आय सी कॉलनी म्हणजे एम एच बी कॉलनी पोलिसांच्या हद्दीत गुरुवारी घडली. दरम्यान या खळबळजनक प्रकरणाचा तपास हा गुन्हे शाखेला वर्ग करण्यात आल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने लोकमत ला सांगितले. त्यानुसार गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी तपास करायला सुरुवात केली असून प्रत्यक्ष दर्शीचे जबाब, तसेच तांत्रिक पुरावे पडताळण्यास सुरवात केली आहे.

उद्धव ठाकरे घेणार निवास स्थानी भेटमुंबई:शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सकाळी ११ वाजता दिवंगत अभिषेक घोसाळकर यांच्या अंत्यदर्शनासाठी त्यांच्या निवासस्थानी येणार असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. तसेच बोरिवली पूर्वच्या दत्तपाडा स्मशानभूमीमध्ये अभिषेक यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले.

टॅग्स :मुंबईगुन्हेगारीपोलिसअभिषेक घोसाळकर