धक्कादायक दावा! अभिषेक यांच्या पत्नी तेजस्वी घोसाळकरांनाही मारण्याचा होता कट

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2024 05:15 PM2024-03-19T17:15:52+5:302024-03-19T18:35:56+5:30

जर ९० दिवसांत चार्जशीट दाखल न केल्यास आरोपीला फायदा होईल त्यामुळे हायकोर्टात याचिका करणार आहोत असं विनोद घोसाळकर यांनी सांगितले. 

Abhishek Ghosalkar murder investigation not going in right direction, Vinod Ghosalkar, Tejashvee Ghosalkar allege | धक्कादायक दावा! अभिषेक यांच्या पत्नी तेजस्वी घोसाळकरांनाही मारण्याचा होता कट

धक्कादायक दावा! अभिषेक यांच्या पत्नी तेजस्वी घोसाळकरांनाही मारण्याचा होता कट

मुंबई - Tejasvee Ghosalkar on Abhishek Ghosalkar Murder ( Marathi News )  ज्या कार्यक्रमाला मॉरिस नरोनानं अभिषेकला बोलावले तिथे मलाही घेऊन या असं सांगण्यात आलं होतं. अभिषेकनं मला ही गोष्ट सांगितली, पण उशीर झाल्याने मला अभिषेकनं दुसऱ्या कार्यक्रमाला पाठवले. याचा अर्थ मलाही मारण्याचा कट होता. माझ्या २ मुलांचे नशीब म्हणून मी तिथे पोहचले असा खुलासा करत अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी तेजस्वी घोसाळकर यांनी पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. 

तेजस्वी घोसाळकर म्हणाल्या की, अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येचा तपास योग्य दिशेने होत नाही. या तपासात आम्ही जमा केलेली माहिती तपास यंत्रणा आणि पोलीस आयुक्तांना दिली. हत्येच्या वेळेला सदर ठिकाणी अमरेंद्र मिश्रा, मेहुल पारेख आणि अज्ञात व्यक्तीचा होत असलेला वावर याबाबत सखोल तपास तपास करावा अशी मागणी आम्ही केली होती. परंतु याबाबत पोलिसांनी आजवर सखोल तपास केल्याचं दिसत नाही. या प्रकरणी हायकोर्टात रिट पीटीशन करून तपास यंत्रणेकडून तपास काढून दुसऱ्या यंत्रणांकडे हा तपास द्यावा अशी दाद मागणार असल्याचं त्यांनी म्हटलं. 

तर माझ्या मुलाच्या हत्येनंतर राज्याचे गृहमंत्री, मंत्री उदय सामंत, मंत्री छगन भुजबळ यांनी केलेली बेजबाबदार विधाने मूळ प्रश्नापासून वळवण्याचा आणि लोकांमध्ये संभ्रम निर्माण करणारी आहेत. मुलाच्या हत्येनंतर सर्वच राजकीय पक्षांनी सर्वधर्मीयांनी प्रत्यक्ष भेटून आमच्या परिवाराचे सांत्वन केले. मात्र गृहमंत्री यांनी विधान परिषद सभागृहात केलेले निवेदन राजकीय असून मनाला वेदना देणारे आहे. त्यामुळे तपासाची दिशाही बदलली असा आरोप ठाकरे गटाचे नेते विनोद घोसाळकर यांनी केला. 

दरम्यान, सत्र न्यायलयाने या घटनेत नोंदवलेली निरिक्षणे पाहता आरोपीवर १२० बी, सेक्शन ३४ हे कलम लावण्याची मागणी करूनही ते लावले नाही. आरोपीचे उच्चपदस्थ राजकीय पुढाऱ्यांशी संबंध होते. आरोपीला राजकारणात पुढे जायची महत्त्वाकांक्षा होती त्याचा फायदा घेऊन आमच्या कुटुंबियांना राजकारणातून दूर करण्याचा कट रचला. पेन ड्राईव्हमध्ये अभिषेकच्या हत्येच्या अगोदर त्याठिकाणी जे संशयित दिसत आहेत त्यांचा कसून तपास करावा. आज हत्येला ४० दिवस झाले. जर ९० दिवसांत चार्जशीट दाखल न केल्यास आरोपीला फायदा होईल त्यामुळे हायकोर्टात याचिका करणार आहोत असंही विनोद घोसाळकर यांनी सांगितले. 
 

Web Title: Abhishek Ghosalkar murder investigation not going in right direction, Vinod Ghosalkar, Tejashvee Ghosalkar allege

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.