'अभिषेक घोसाळकरांची हत्या धक्कादायक अन् चीड आणणारी'; आदित्य ठाकरे संतापले!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2024 08:34 AM2024-02-09T08:34:59+5:302024-02-09T08:35:54+5:30

सदर घडलेल्या घटनेवरुन राज्यभरातून विविध प्रतिक्रिया येत आहे. तसेच या घटनेचा निषेध व्यक्त केला जात आहे.

'Abhishek Ghosalkar's killing shocking and infuriating'; Aditya Thackeray is angry! | 'अभिषेक घोसाळकरांची हत्या धक्कादायक अन् चीड आणणारी'; आदित्य ठाकरे संतापले!

'अभिषेक घोसाळकरांची हत्या धक्कादायक अन् चीड आणणारी'; आदित्य ठाकरे संतापले!

फेसबुक लाइव्हदरम्यान शिवसेनेच्या ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकरांवर मॉरिस नोरोन्हा ऊर्फ मॉरिस भाईच्या कार्यालयातच पाच गोळ्या झाडून त्यांची हत्या केल्याने मुंबई हादरली. घोसाळकरांच्या हत्येपाठोपाठ मॉरिसनेही स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याचा संशय आहे. याप्रकरणी पोलिसांसह गुन्हे शाखा अधिक तपास करत आहे. 

सदर घडलेल्या घटनेवरुन राज्यभरातून विविध प्रतिक्रिया येत आहे. तसेच या घटनेचा निषेध व्यक्त केला जात आहे. माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी देखील ट्विट करत अभिषेक घोसाळकर ह्यांची निर्दयीपणे झालेली हत्या धक्कादायक आणि चीड आणणारी आहे, असं म्हटलं आहे. शिवसेनेचे नगरसेवक आणि कडवट शिवसैनिक म्हणून त्यांनी केलेले कार्य विसरता येणार नाही. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली...घोसाळकर कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत, असं आदित्य ठाकरे म्हणाले. 

आदित्य ठाकरेंनी राज्य सरकारवर देखील टीका केली आहे. महाराष्ट्राने ह्यापूर्वी कधीच अशी अराजकता पाहिली नव्हती. कायदा सुव्यवस्थेच्या चिंधड्या उडताना पाहणं धक्कादायक आणि सुन्नं करणारं आहे. सामान्य माणसाच्या रक्षणासाठी यंत्रणा अस्तित्वात तरी आहे का? कायद्याचा धाक उरलाय का? प्रशासन आणि व्यवस्था संपूर्णपणे ढासळलीये, हे भीषण आहे, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

शिवसैनिकांनी केली ताेडफाेड

चिडलेल्या शिवसैनिकांनी मॉरिसच्या कार्यालयाची तोडफोड केली. हा पूर्वनियोजित कट असल्याचा संशय आहे. मॉरिसने कोरोना काळात अनेकांना मदत केली होती. त्याची पार्श्वभूमी गुन्हेगारीची होती. अभिषेक यांचा मृतदेह करुणा, तर मॉरिसचा मृतदेह शताब्दी रुग्णालयात ठेवण्यात आला आहे. घटनास्थळी सह आयुक्त सत्यनारायण चौधरी, अपर पोलिस आयुक्त राजीव जैन यांनी धाव घेतली.

Web Title: 'Abhishek Ghosalkar's killing shocking and infuriating'; Aditya Thackeray is angry!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.