गावच्या मातीत दिलासा देण्याची क्षमता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 04:05 AM2021-05-24T04:05:17+5:302021-05-24T04:05:17+5:30
मुंबई : सध्या आर्थिक, वैद्यकीय आणि उदरनिर्वाहाच्या प्रश्नांनी आपल्याला घेरलेले असताना आपल्याला दिलासा देण्याची ...
मुंबई : सध्या आर्थिक, वैद्यकीय आणि उदरनिर्वाहाच्या प्रश्नांनी आपल्याला घेरलेले असताना आपल्याला दिलासा देण्याची क्षमता गावच्या मातीत आहे, असे पर्यटन आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे हे १४ व्या जागतिक कृषी पर्यटन परिषदेच्या उद्घाटनाप्रसंगी बोलत होते.
जागतिक कृषी पर्यटन दिनानिमित्त कृषी पर्यटन विकास संस्था यांनी शासनाच्या पर्यटन संचालनालयांच्या साहाय्याने जागतिक कृषी पर्यटन परिषद २०२१ चे आभासी माध्यमाद्वारे आयोजन केले होते. यंदाच्या परिषदेत कृषी पर्यटन - महिला शेतकरी उद्यमशीलता विकास अशी संकल्पना होती.
आदित्य ठाकरे म्हणाले, कृषी पर्यटन शासनाला पर्यटन आणि शेती या दोन मोठ्या क्षेत्रांना एकत्र आणण्याची संधी देत आहे. कोविड १९ च्या वैश्विक संकटाने आपण त्रस्त आहोत; पण या काळात जगभरातील ज्ञान जाणून घेण्याची, शिकण्याची आणि स्वतःत सुधारणा करण्याची सुवर्णसंधी आपल्याला या परिषदेच्या निमित्ताने मिळाली आहे. आपण भूतान, स्पेन इत्यादी देशांसारखे आपले ग्रामीण भौगोलिक व नैसर्गिक सौंदर्य सगळ्या जगाचे आकर्षण बनेल यात शंका नाही.
पर्यटन राज्यमंत्री अदिती तटकरे म्हणाल्या, कृषी पर्यटन राज्याला आर्थिक संकटातून बाहेर काढू शकेल. विशेषतः अशा शाश्वत पर्यटन उपक्रमाचे तरुण पिढीला आकर्षण आहे. पर्यटन क्षेत्रात महाराष्ट्र देशातील आघाडीचे राज्य आहे. या क्षेत्रामुळे राज्य म्हणून आपण संकटकाळात देखील चांगले काम करत आहोत.