सरत्या वर्षात मुंबईत १ लाख २७ हजार मालमत्तांची विक्री
By मनोज गडनीस | Published: December 30, 2023 05:11 PM2023-12-30T17:11:59+5:302023-12-30T17:12:44+5:30
निवासी, व्यावसायिक दोन्ही मालमत्तांची टक्केवारी वाढली.
मनोज गडनीस, मुंबई : मुंबईच्या प्रॉपर्टी बाजाराने यंदा नवा विक्रम रचला असून चालू वर्षात जानेवारी ते डिसेंबर या कालावधीमध्य मुंबईत तब्बल १ लाख २७ हजार १३९ मालमत्तांची विक्री झाली आहे. मालमत्ता विक्रीचा हा ११ वर्षांतील उच्चांक आहे.
बांधकाम क्षेत्रातील अग्रगण्य अशा नाईट फ्रँक कंपनीने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, या मालमत्तांच्या व्यवहारातील मुद्रांक शुल्कापोटी राज्य सरकारला एकूण १० हजार ८८९ कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. १० वर्षांत प्रथमच राज्य सरकारला एका वर्षात मालमत्ता विक्रीतून एवढ्या मोठ्या प्रमाणावर महसूल मिळाला आहे.