एका दिवसात १०० कोटींचा मालमत्ता कर वसूल; आर्थिक वर्षअखेरीमुळे जोरदार मोहीम
By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2024 09:48 AM2024-03-21T09:48:01+5:302024-03-21T09:50:14+5:30
आर्थिक वर्ष संपत आल्याने मुंबई महापालिकेने मालमत्ता कराच्या थकबाकीसह अन्य थकीत कर, पाणीबिले वसुलीवर भर दिला आहे.
मुंबई : आर्थिक वर्ष संपत आल्याने मुंबई महापालिकेने मालमत्ता कराच्या थकबाकीसह अन्य थकीत कर, पाणीबिले वसुलीवर भर दिला आहे. त्याचाच एक भाग म्हणून महापालिकेने बड्या कर थकबाकीदारांची यादीच जाहीर केली होती. त्यानंतर महापालिकेच्या करनिर्धारण व संकलन विभागाने मंगळवार, १९ मार्च रोजी एकाच दिवसात मालमत्ता कराची तब्बल १०० कोटी ५५ लाख ६९ हजार रुपयांची विक्रमी वसुली केली आहे.
कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण -
करनिर्धारण व संकलन विभागातील कर्मचाऱ्यांनाही नवीन तंत्रज्ञानाच्या मदतीने कमीतकमी कालावधीमध्ये जास्तीत जास्त मालमत्ता कर कसा वसूल केला जाऊ शकतो, याचेही प्रशिक्षण दिले जात आहे. या सर्वांचा परिणाम म्हणजे नागरिकांकडून मालमत्ता कर भरण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. १९ मार्च रोजी एकाच दिवसात तब्बल १०० कोटी रुपयांची विक्रमी वसुली करण्यात आली आहे.
विभागनिहाय कर वसुली -
ए विभाग ५ कोटी ३९ लाख
बी विभाग ६७ लाख ३७ हजार
सी विभाग १ कोटी ६९ लाख
डी विभाग ६ कोटी ९२ लाख
ई विभाग १ कोटी ६३ लाख
एफ दक्षिण विभाग ५३ लाख ७२ हजार
एफ उत्तर विभाग ७९ लाख ९६ हजार
जी दक्षिण विभाग ४ कोटी ४४ लाख
जी उत्तर विभाग ३ कोटी ३१ लाख
एच पूर्व विभाग ५ कोटी ७२ लाख
एच पश्चिम विभाग ५ कोटी ९० लाख
के पूर्व विभाग ७ कोटी ७२ लाख
के पश्चिम विभाग ५ कोटी ७३ लाख
पी दक्षिण विभाग २ कोटी ७८ लाख
पी उत्तर विभाग ३ कोटी १७ लाख
आर दक्षिण विभाग १ कोटी ७४ लाख
आर मध्य विभाग २ कोटी ५१ लाख
आर उत्तर विभाग १ कोटी ८६ लाख
एल विभाग २ कोटी २१ लाख
एम पूर्व विभाग ५८ लाख ९१ हजार
एम पश्चिम विभाग २ कोटी ४६ हजार
एन विभाग १ कोटी २६ लाख
एस विभाग २९ कोटी ३.४८ लाख
टी विभाग २ कोटी ३७.६४ लाख