विषारी धूर सोडणाऱ्या ‘त्या’ १२ भट्ट्या काढल्या, ‘सी’ विभागात महापालिकेची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2024 10:06 AM2024-03-02T10:06:29+5:302024-03-02T10:07:53+5:30

वायूप्रदूषण व धूळ नियंत्रणासाठी महापालिकेकडून प्रयत्न सुरु आहेत.

about 12 furnaces emitting toxic fumes were removed municipal corporation action in c section in mumbai | विषारी धूर सोडणाऱ्या ‘त्या’ १२ भट्ट्या काढल्या, ‘सी’ विभागात महापालिकेची कारवाई

विषारी धूर सोडणाऱ्या ‘त्या’ १२ भट्ट्या काढल्या, ‘सी’ विभागात महापालिकेची कारवाई

मुंबई : काळबादेवीच्या  नागरी वस्तीतील  सोने-चांदी गलाई व्यावसायिकांच्या बारा भट्ट्या आणि धुराडी मुंबई महापालिकेने काढून टाकली.  महानगरपालिकेच्या या व्यावसायिकांच्या कारखान्यात सोने-चांदी वितळविण्याचे काम होते.  हे काम केले जात असताना  निर्माण होणाऱ्या घातक  वायूवर कोणतीही प्रक्रिया न करता तो वातावरणात सोडला जात होता. त्यामुळे भट्ट्या आणि धुराडी काढून टाकण्याची कारवाई करण्यात आली.

वायूप्रदूषण व धूळ नियंत्रणासाठी महापालिकेकडून प्रयत्न सुरु आहेत. काळबादेवी भागात सोने-चांदी  वितळवणारे कारखाने आहेत. येथे नियमांचे पालन होत नाही. भट्ट्यांमधून सोडल्या जाणाऱ्या घातक वायूमुळे आरोग्याच्या समस्या भेडसावत असल्याच्या तक्रारी केल्या होत्या. या तक्रारींची दखल घेत कारवाईचा बडगा उगारण्यात आला. अशा प्रकारची कार्यवाही कार्यवाही यापुढे देखील सुरू राहणार आहे, अशी माहिती ‘सी’ विभागाचे सहायक आयुक्त  उद्धव चंदनशिवे यांनी दिली.

वायु प्रदूषण नियमांचे उल्लंघन :

सोने-चांदी गलाई व्यवसायात सोने-चांदी वितळवण्यात येते. त्यासाठी छोटेखानी स्वरुपाचा कारखाना असतो. यामध्ये सोने-चांदी वितळवण्यासाठी भट्टीचा वापर केला जातो. त्यातून निर्माण होणारे आम्ल आणि वायू आदी चिमणी-धुराडे याद्वारे हवेत सोडले जातात. शास्त्रीय प्रक्रिया न करता सोडण्यात आलेल्या वायूमुळे मानवी आरोग्याला धोका पोहोचतो. या घातक वायूमुळे प्रदूषणात भर पडत असल्याने महानगरपालिकेने वायू प्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्या गलाई व्यावसायिकांविरोधात कारवाई केली.

Web Title: about 12 furnaces emitting toxic fumes were removed municipal corporation action in c section in mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.