मुंबईतील दहावीच्या निकालात दोन टक्क्यांनी वाढ; यंदाही मुलीच सरस
By रेश्मा शिवडेकर | Published: May 27, 2024 05:00 PM2024-05-27T17:00:16+5:302024-05-27T17:01:35+5:30
इतर विभागांच्या तुलनेत मुंबई तिसऱ्या क्रमांकावर आहे.
रेश्मा शिवडेकर,मुंबई : मुंबई शहर, उपनगरे, ठाणे, रायगड, पालघर यांचा समावेश असलेल्या मुंबई विभागाचा दहावीचा निकाल गेल्या वर्षीच्या तुलनेत दोन टक्क्यांनी वधारला आहे. गेल्या वर्षी दहावीचा निकाल ९३.६६ टक्के इतका लागला आहे. यंदा निकालात ९५.८३ टक्के इतकी वाढ झाली आहे. इतर विभागांच्या तुलनेत मुंबई तिसऱ्या क्रमांकावर आहे.
यंदा मुंबईतून नियमित ३,३९,२६९ विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती. त्यापैकी ३,२५,१४३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यात मुलींची उत्तीर्णतेची टक्केवारी जास्त म्हणजे ९६.९५ टक्के आणि मुलांची ९४.७७ टक्के आहे.
परीक्षेला बसलेल्या एकूण मुली - १,६५,४२३, उत्तीर्ण - १,६०,३८१
परीक्षेला बसलेले एकूण मुलगे - १,७३,८४६, उत्तीर्ण - १,६४,७६२
मुंबईची विभागनिहाय टक्केवारी-
विभाग - २०२३ - २०२४
ठाणे - ९३.६३ - ९५.५६
रायगड - ९५.२८ - ९६.७५
पालघर - ९३.५५ - ९६.०७
मुंबई शहर - ९३.९५ - ९६.१९
मुंबई उपनगर १ - ९३.५५ - ९६.१०
मुंबई उपनगर २ - ९२.५६ - ९४.८८
मुंबईचा गेल्या तीन वर्षातील निकाल-
२०२४ - ९५.८३ टक्के
२०२३ - ९३.६६ टक्के
२०२२ - ९६.९४ टक्के (परिक्षा सुरळीत मात्र कोविडमुळे अभ्यासक्रम कमी)
२०२१ - ९९.९५ टक्के (कोविडमुळे परीक्षा न झाल्याने सरासरी मूल्यांकनानुसार निकाल)
२०२० - ९५.३० (कोविड सुरू होण्याच्या आधी परीक्षा झाली होती)