Join us

‘मेट्रो २ ब’च्या स्थानकांवरील लिफ्ट, सरकते जिने, डिझाईनसाठी २६८ कोटी!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 08, 2024 9:51 AM

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या वतीने मुंबई महानगर प्रदेशातील मेट्रोची कामे वेगाने हाती घेण्यात आली आहेत.

मुंबई :मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या वतीने मुंबई महानगर प्रदेशातील मेट्रोची कामे वेगाने हाती घेण्यात आली आहेत. या मेट्रोच्या देखभालीवरही तेवढेच बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. त्यानुसार, ‘मेट्रो २ ब’च्या स्थानकांच्या कामांसोबत उर्वरित कामांसाठी १४८ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. तर कॉरिडॉरसह इतर कामांवर १२० कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. ‘मेट्रो २ ब’च्या कामांकरिता ‘एमएमआरडीए’ने निविदा काढल्या आहेत. 

डी.एन.नगर ते मंडाले या मार्गिकेवरील २० स्टेशनच्या लिफ्ट, सरकते जिने बसविणे, डिझाइन, उत्पादन, पुरवठा, चाचणी, कमिशनिंग व कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण देखभालीसह दोन वर्षांच्या दोष दायित्व कालावधीनंतर तीन वर्षांच्या देखभालीच्या कामाकरिता निविदा काढण्यात आली आहे. मेट्रो मार्गिका २ व कॉरिडॉर या मार्गावर रचना, निर्मिती, पुरवठा, चाचणी, २ वर्षांच्या दोष दायित्व कालावधी, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याकरिता प्रशिक्षण देण्यासाठी काम केले जाणार आहे. यासाठी १२० कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.

  ‘मेट्रो २ ब’ या मार्गाचे काम ३ पॅकेजमध्ये सुरू आहे.

  जून आणि जुलै या मान्सूनच्या महिन्यात ३३ पियर्स, तसेच २३ पियर कॅप्सची उभारणी करण्यात आली होती.

 मेट्रोसाठी मानखुर्द मंडाळे येथे डेपोचे काम सुरू आहे.

 ७० टक्क्यांपेक्षा अधिक काम झाले आहे. 

  मेट्रो कार डेपो : मंडाळे येथील ३० हेक्टर जागेत

  आगारातील २१ मीटर उंचीची सिम्युलेटर इमारत ही तीन मजली इमारत आहे.

  डेपोमध्ये स्टेबलिंग यार्डच्या दोन स्तरांवर ८ डब्यांचे ७२ रेक बसविण्याची क्षमता असेल.

  डेपोमध्ये अवजड उपकरणे बदलण्यासाठी लिफ्टिंग आणि चाचणी, अवजड उपकरणांची दुरुस्ती इत्यादी सुविधा असतील.

‘मेट्रो २ ब’ची जोडणी कुठे?

  कुर्ला रेल्वेस्थानक

 मान खुर्द रेल्वेस्थानक

  मोनोरेलचे चेंबूर स्थानक

  डी.एन. नगर येथे मेट्रो मार्ग १

  कुलाबा-वांद्रे-सीप्झ या भुयारी मेट्रो ३ मार्गाशी वांद्रे येथील जंक्शन

  वडाळा ते ते कासारवडवली (ठाणे) दरम्यान धावणाऱ्या मेट्रो ४ सोबत कुर्ला

टॅग्स :मुंबईमेट्रोएमएमआरडीए