Join us

जुनं ते सोनं ! इंजिन्स, रुळ विकून कमावले ३०० कोटी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2024 10:11 AM

मध्य रेल्वेने ३०० कोटींचे भंगार विक्रीचे उद्दिष्ट ओलांडून ३००.४३ कोटी मिळविले आहेत. 

मुंबई : मध्य रेल्वेने जुने इंजिन्स, अतिरिक्त डिझेल इंजिन, वापरात नसलेले जुने रेल्वे रुळ आणि अपघात झालेले इंजिन / डब्बे यांसह विविध प्रकारचे भंगारची विल्हेवाट लावण्यासाठी पावले उचलली आहेत. त्यानुसार मध्य रेल्वेने ३०० कोटींचे भंगार विक्रीचे उद्दिष्ट ओलांडून ३००.४३ कोटी मिळविले आहेत. 

एप्रिल ते डिसेंबर या कालावधीतील विक्रीच्या उद्दिष्टापेक्षा ३२.२३ टक्क्यांची वाढ झाली आहे. आर्थिक वर्ष पूर्ण होण्यास अडीच महिने शिल्लक असताना मध्य रेल्वेने रेल्वे बोर्डाचे भंगार विक्रीचे लक्ष्य पार करणारी पहिली क्षेत्रिय रेल्वे होण्याचा टप्पा गाठला आहे.

शून्य भंगार मोहिमेसाठी भंगार विक्री उत्पन्न :

भुसावळ विभाग                   ५९.१४ कोटीमाटुंगा डेपो                         ४७.४० कोटीमुंबई विभाग                        ४२.११  कोटीपुणे विभाग                          ३२.५१  कोटीभुसावळ लोको शेड डेपो     २७.२३ कोटीसोलापूर विभाग                   २६.७३ कोटी नागपूर विभाग                     २४.९२ कोटीइतर ठिकाणी एकत्रितपणे    ४०.३९  कोटी

टॅग्स :मध्य रेल्वे